भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या महिलांवर ब्लेडने वार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-आरोपीकडून पतीला मारहाण होत असल्याचे पाहता पत्नी व मुली भांडणे सोडविण्यासाठी आल्या असता त्यांना देखील आरोपींनी मारहाण करून ब्लेडने वार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे घडली आहे.

याप्रकरणी पंकज दगडु खपके (वय ४३ धंदा मजुरी, रा. लाखरोड टाकळीमियॉ ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.

खपके यांनी फिर्यादीत म्हंटले आहे कि, फिर्यादी पंकज खपके त्यांच्या घरासमोर असताना आरोपी हे फिर्यादीचे घरासमोर मोटार सायकलवर बसून आले.

आणि फिर्यादीस मारहाण करू लागले. यावेळी फिर्यादीची पत्नी व मुली मनिषा, सोनाली व प्रांजली हया घराबाहेर आल्या असता त्यांना पण आरोपींनी मारहाण केली.

फिर्यादीची मुलगी मनिषा हिला आरोपी पप्पु जगधने याने ब्लेडने डाव्या हाताच्या तळव्यावर मारहाण करुन शिवीगाळ केली.

याप्रकरणी पंकज दगडू खपके यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी 1) दामु जगधने 2) पप्पु जगधने 3) अनोळखी इसम 4) हिराबाई जगधने व दोन अनोळखी महिला अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24