Paytm Tips : स्मार्टफोन चोरीला गेला तर अशाप्रकारे ब्लॉक करा तुमचे पेटीएम अकाउंट, नाहीतर..
जवळपास सर्वजण आता स्मार्टफोन वापरू लागले आहे. स्मार्टफोनमुळे सगळे जग एकत्र आले आहे. कोणीतीही कामे आता सहज होऊ लागली आहेत.
Paytm Tips : स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण आता वाढू लागले आहे. स्मार्टफोनमुळे आता सगळी कामे एका मिनिटात होऊ लागली आहेत. स्मार्टफोन वापरकर्ते आता डिजिटल व्यवहार करू लागले आहेत. फोनपे, पेटीएम सारखी पेमेंट अॅप वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
यामुळे आता तुम्हाला पैशांसाठी बँकेच्या लांबच लांब रांगांमध्ये उभे राहावे लागत नाही. तसेच कितीही दूर असणाऱ्या व्यक्तींना सहज पैसे पाठवता येतात. परंतु, अनेकांचा स्मार्टफोन चोरीला जातो अशावेळी तुमच्या खात्यातून चोर सहज पैसे काढू शकतो. परंतु, आता यावर एक सोपा मार्ग आहे ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील.
असे करा पेटीएम खाते ब्लॉक
स्टेप 1
- जर तुमचा मोबाईल चोरीला गेला असेल किंवा तुमच्यासोबत असे घडले असेल आणि अशा परिस्थितीत तुम्हाला तुमचे पेटीएम खाते ब्लॉक करायचे असेल तर
- यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर दुसऱ्या मोबाईलमध्ये पेटीएम अॅप इन्स्टॉल करावे लागणार आहे.
स्टेप 2
- यानंतर, तुम्हाला तुमच्या जुन्या खात्याचा यूजर आयडी, पासवर्ड आणि मोबाइल नंबर टाकून इंस्टॉल केलेल्या पेटीएममध्ये लॉग इन करावे लागणार आहे.
- लॉग इन होताच तुम्हाला ‘हॅम्बर्गर मेनू’ वर जावे लागणार आहे.
- त्यानंतर तुम्हाला ‘सुरक्षा आणि गोपनीयता’ विभागात जावे लागणार आहे.
स्टेप 3
- आता तुम्हाला मॅनेज अकाउंटचा पर्याय मिळेल.
- येथे तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही तुमच्या खात्यातून लॉग आउट करू इच्छित आहे की नाही?
- तुम्हाला होय वर क्लिक करावे लागणार आहे.
- तुम्ही होय वर क्लिक करताच तुमचे पेटीएम खाते तुमच्या चोरीला गेलेल्या मोबाईलवरून निष्क्रिय होते.
हे लक्षात ठेवा की ही प्रक्रिया करताना तुम्हाला काही समस्या आली तर तुम्ही पेटीएमच्या हेल्पलाइन नंबर 0120-4456456 वर कॉल करू शकता. तुम्हाला येथून योग्य मदत मिळू शकते.