अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :-कोरोना आजाराने अनेक ठिकाणी गावागावात कुटुंब उद्ध्वस्त झाली असून माणुसकीला काळीमा फासणारी अनेक उदाहरणे आता गावागावात पुढे येऊ लागली आहे.
असेच एक उदाहरण राहुरी तालुक्यातील एका गावातील असून एका कुटुंबातील आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कुटुंबातील लहान भाऊ बहीणीला कुठे ठेवायचे असा प्रश्न या कुटुंबापुढे निर्माण झाला.
हे कुटुंब माझ्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी गेल्या सात ते आठ दिवसांपूर्वी दाखल झाले होते.
परंतु उपचार घेत असताना आपल्या कोरोनाबाधित आईने राहुरी येथील भावाला फोनवरून मी व तुझा दाजी कोरोना बाधित आढळून आले असून तुझ्या भाचा व भाचीला आम्ही बरे होईपर्यंत तुझ्याकडे ठेव, अशी विनंती केली.
परंतु महिलेच्या भावाने नकार देत आम्ही त्यांना ठेवू शकत नाही त्यामुळे त्यांची व्यवस्था तु दुसरीकडे कर, असे ठणकावून सांगितले. या कुटुंबातील प्रमुखांसह या दोन भावा-बहिणीने पुढे मोठा पेच निर्माण झाल्यानंतर ही गोष्ट मला समजली.
मी या कुटुंबाला आधार देत तुम्ही या ठिकाणी निश्चिंतपणे उपचार घ्या, तुमच्या दोन्ही मुलांची जबाबदारी माझी, असे म्हणून सेंटरमध्ये ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा राबता असतो त्या ठिकाणी दोन स्वतंत्र बेड लावून दोन्ही भावा-बहिणींची गेल्या आठ दिवसांपासून ते सेवा करत आहे.
माझ्या कुटुंबातील सदस्य या नात्याने काळजी घेत आहेत. मी यांच्या पालकत्वाची जबाबदारी घेतो.त्यामुळे अंगावर असणाऱ्या कपड्यानिशी या दोघा भावाबहिणींना सुद्धा त्यांच्या बरोबर यावे लागले. त्यामुळे या दोघा भावा- बहिणींना नवीन कपडे बुधवारी घेऊन दिले आहे.