जिल्ह्यात दिवसाआड आढळतायत मृतदेह ; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मृतदेह आढळून आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घातपात करून हे मृतदेह फेकण्यात आले असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.

यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात रेल्वे मार्गानजीक एक मृत इसम आढळल्याने खळबळ उडाली आहे.

हा मृत व्यक्ती सैनिक असल्याचे समजते. शनिवार दि. 13 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास एका 45 ते 50 वय असलेला इसम मृत अवस्थेत आढळून आला.पोलीस कर्मचारी घटनास्थळी हजर झाले.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदरील इसमाचा मृतदेह पंचनामा करत असताना तो संतोष सिंग नामक इसम सैनिक असून पुणे डिव्हिजन येथे कार्यरत आहे.

पंजाब येथील रहिवासी असल्याचे त्याच्या खिशातील कागदपत्रे व चौकशीतुन पोलिसांना समजते. तसेच संतोष सिंग यांच्या फोन नंबरवर फोन केला असता ते प्रवास करत असलेल्या पुणे-पंजाब गाडीतील शेजारी बसलेल्या

प्रवाशांनी सिंग यांचा फोन उचलला असता सिंग यांची बॅग व मोबाईल रेल्वे गाडीतच असल्याचे स्पष्ट झाले तसेच संतोष सिंग हे रेल्वे मार्गाच्या कडेला असलेल्या

पोलला आदळून पडून जबर मार लागून जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र संतोष सिंग हे रेल्वे गाडीतून पडले की अन्य काही कारण असू शकते हे मात्र पोलीस तपासात समजेल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24