अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- सोनई येथील कौतुकी नदीपात्रातील मारुती मंदिर परीसरात काल सकाळी दत्तू किसन शिंदे वय ४० याचा मृतदेह सापडल्याने ग्रामस्थांत खळबळ उडाली.

माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी भेट देवून पाहणी केली. नेवासा फाटा ग्रामीण रुग्णालयात शिंदे यांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.

वैद्यकीय अधिका-यांनी दिलेल्या खबर नुसार सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३९/२०२१ भा.द.वि.१७४ प्रमाणे नोंद घेण्यात आली. जादा दारु पिल्याने मृत झाल्याचे खबरीमध्ये नोंद आहे. अधिक तपास हवालदार एच.एम गर्जे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24