भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा मृतदेह आढळला पोलीस म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:- दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका पार्कमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते जी. एस. बावा यांचा मृतदेह आढळून आला आहे. त्यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पश्चिम जिल्हा बाजपचे माजी उपाध्यक्ष जी. एस. बावा यांनी सोमवारी संध्याकाळी सुभाषनगर येथील तवाल असलेल्या पार्कमध्ये ग्रीला लटकून आत्महत्या केल्याचं बोललं जातंय. पार्कमध्ये फिरत असलेल्या काही जणांना त्यांचा मृतदेह ग्रीलला लटकलेला दिसून आला.

त्यानंतर ही घटना समोर आली. ५८ वर्षांचे भाजप नेते जी. एस. बावा पश्चिम दिल्लीतील फतेह नगरमध्ये रहात होते.

होळीच्या दिवशी सोमवारी संध्याकाळी ६ वाजता पार्कमध्ये फिरत असलेल्या काही जणांनी दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली.

पार्कमध्ये ग्रीला कुणाचातरी मृतदेह लटकला आहे, असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

यानंतर मृतदेह हा भाजपचे वरिष्ठ नेते जी. एस. बावा यांचा असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|

 

अहमदनगर लाईव्ह 24