अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- बॉलिवूडमधील सर्वात हॉट आणि मोस्ट लव्ह कपल अर्जुन कपूर मलायका अरोरा विभक्त झाले आहेत. अर्जुन आणि मलायकामध्ये ब्रेकअप झाले आहे.
मलायका आणि अर्जुन हे बॉलिवूडमधल्या सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या जोड्यांपैकी एक आहेत. त्यांच्या डेटिंगपासून ते त्यांच्या अफेअरपर्यंत सगळ्याच गोष्टींची चर्चा होते.
सध्या मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा सिनेवर्तुळात रंगली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने त्यांच्या रोमँटिक नात्याला पूर्णविराम दिला आहे. आता दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत.
मलायका आणि अर्जुनमध्ये वयाचे मोठे अंतर आहे. त्यावरून दोघांवर टीकेचा भडीमार देखील झाला होता. असे असताना देखील अर्जुन कायम होणाऱ्या टीकेकडे कायम दुर्लक्ष करत होता.
मलायकावर आपले जीवापाड प्रेम असून त्याला वय महत्त्वाचं वाटत नाही, असे देखील अर्जुनने म्हटले होते. मलायला अरोरा आणि अभिनेता अरबाज खान यांनी 19 वर्षांच्या संसारानंतर 2017 ला एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
अरबाजशी काडीमोड घेतल्यानंतर मलायला आणि अर्जुनच्या अफेअरची चर्चा रंगली. या दोघांना सतत एकत्र स्पॉट केलं जाऊ लागलं. मलायका आणि अर्जुन यांच्या ब्रेकअपची सध्या जोरदार चर्चा आहे.
यावर आता मलायला आणि अर्जुन काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं आहे. अर्जुनशी काडीमोड घेतल्यानंतर मलायकाला मोठा धक्का बसला आहे. या दु:खातून स्वत:ला सावरण्यासाठी मलायकाने खोलीत कोंडून घेतल्याचे समजते.
दरम्यान, गेल्या वर्षी 1 जानेवारी 2021 रोजी मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अर्जुन कपूरसोबतचे नाते जगजाहीर केले होते. पंरतु आता मलायका आणि अर्जुन या लव्हली कपलने कुठे स्पॉट होणार नाही, अशी माहिती समजते.