अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- बुधवार ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने केलेला कायदा वैध्य नसल्याने सुप्रीम कोर्टा कडून स्पष्ट करण्यात आल आहे.
अशातच मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.राहुरी येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करून करून तरुण रस्त्यावर उतरले आहेत.
यावेळी अ.भा.छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देवेंद्र लांबे पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय आज देण्यात आलेला आहे.या निर्णयामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर दुखावला गेला आहे.
सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडले आहे,त्यामुळेच मराठ्यांचे आरक्षण न्यायालयात टिकू शकलेले नाही. या परिस्थिति मध्ये राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवते आहे.
आम्ही राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारला सांगू इछितो की आपण समन्वयातून मराठा समजाच्या आरक्षणा विषयी मार्ग काढावा.कोरोंना प्रादुर्भावा मुळे शासकीय यंत्रणेवर अधिक तान पडू नये म्हणून निवडक कार्यकर्त्यांसह आज प्रातींनिधिक स्वरुपात बोंबाबोंब आंदोलन करत आहोत.
भविष्यकाळात वेळीच मराठा समाजाला योग्य न्याय न मिळाल्यास समजाचा उद्रेक होऊन सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार आहे असे लांबे पा.म्हणाले.
यावेळी अ.भा.छावचे जिल्हा प्रमुख नितिन पटारे पाटील उपस्थित होत म्हणाले की,मराठा समाजाने शांतता पूर्वक ५८ मुक मोर्चे काढले. ४२ बाधवांना आरक्षणासाठी बलिदान द्यावे लागले यासर्व गोष्टींचे फलित काय तर मराठा आरक्षण रद्द झाले आहे.
मराठा आरक्षण रद्द होण्यास सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहेत.या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचा आम्ही निषेध करतो असे ते म्हणाले.या प्रसंगी अमोल वाळूंज,अविनाश क्षीरसागर,अशोक धसाळ आदी उपस्थित होते.