अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसात शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली होती. मात्र आता पुन्हा एकदा बाजार सावरताना दिसून येत आहे. कोरोनाचे सावट असले तरीही बाजारात मोठी गुंतवणूक तसेच उलाढाल होत आहे.
यातच आज शेअर बाजारमध्ये चांगली वाढ झाल्याचे दिसून आले. सलग चौथ्या दिवशी शेअर्स बाजारामध्ये तेजीचे वातावरण दिसून आले. प्रमुख निर्देशांक बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये वाढीचा आलेख चढाच राहिला.
सेंन्सेक्स 533.15 अंकाच्या वाढीसह (0.88 टक्के) 61,150.04 वर बंद झाला. निफ्टी 156.60 अंकांच्या वाढीसह (0.87 टक्के) 18,212.35 पोहोचला. आज टॉप-50 शेअर्सपैकी 37 मध्ये तेजीचं चित्र दिसून आले. आणि 13 शेअर्समध्ये पडझड नोंदविली गेली.
गेल्या वर्षी ऑक्टोबर नंतर निफ्टीने पहिल्यांदाच 18,200 टप्पा पार केला आहे. बुधवारी तुलनेत आज प्रमुख शेअर्स एक टक्का वाढीसह बंद झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआसयीआय आणि इन्फोसिसने आजच्या व्यवहारात आघाडी घेतली.
टॉप गेनर्स
• महिंद्रा आणि महिंद्रा – 4.5 टक्के
• भारती एअरटेल Bharti Airtel
• इंडसइंड बँक IndusInd Bank
• आरआयएल RIL
• आयसीआयसीआय बँक ICICI Bank
• टाटा स्टील
लुझर्स शेअर्स
• टायटन कंपनी
• टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
• एचडीएफसी बँक
• टेक महिंद्रा
• विप्रो
आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण आणि कोविड बाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर्स मार्केटमध्ये तेजी नोंदविली गेली. सार्वजनिक वित्तीय बँकांची कामगिरीतही वाढ नोंदविली गेली. बांधकाम क्षेत्रातही विक्री संख्येतील वाढीमुळे तेजीचे वातावरण आहे.