Booster Dose Gap : खुशखबर! बूस्टर डोस घेण्यासाठी आता 9 महिने वाट पाहण्याची गरज नाही

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Booster Dose Gap : नागरिकांना आता कोविड-19 (Covid-19) लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेण्यासाठी 9 महिन्यांची वाट पाहावी लागणार नाही. कारण नुकतेच केंद्र सरकारने (Central Government) कोरोनाच्या बूस्टर डोसचे अंतर कमी करण्याची घोषणा केली आहे. (Booster dose gap)

त्यामुळे बूस्टर डोसच्या प्रतिक्षेत असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याअगोदर बूस्टर डोस 9 महिन्यांनंतर दिला जात होता, परंतु आता दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनंतर म्हणजेच 26 आठवडे बूस्टर डोस दिला जाऊ शकतो. 

18-59 वर्षे वयोगटातील लोकांना डोस मिळू शकेल 

लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाची शिफारस करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) हा निर्णय दिला आहे. सरकारच्या निर्णयानंतर आता 18 ते 59 वयोगटातील सर्व लोकांना 6 महिन्यांच्या अंतराने बुस्टर डोस मिळू शकणार आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. “त्यात असेही नमूद करण्यात आले आहे की 60 वर्षे आणि त्यावरील लाभार्थी तसेच आरोग्य कर्मचारी (HCWs) आणि फ्रंट लाइन वर्कर्स (FLWs) यांना कोविडचा बूस्टर डोस मोफत मिळेल.  

यासंदर्भातील सूचना लवकरच जारी केल्या जातील. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, मी सर्व लाभार्थ्यांना आवाहन करतो की, कोविड लसीकरण केंद्रांसह (CVCs) सध्या सुरू असलेल्या हर घर दस्तक 2 मोहिमेअंतर्गत कोरोनाचा बूस्टर डोस घ्यावा.