अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- कोरोना महामारीच्या संकटकाळात कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या व निस्वार्थ भावनेने रुग्णसेवा करणाऱ्या बुथ हॉस्पिटल मधील महिला डॉक्टर व परिचारिकांचा जागतिक महिला दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषद व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला.
डॉ.सिमरन वधवा यांच्या अध्यक्षतेखाली बुथ हॉस्पिटलमध्ये झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, मेजर ज्योती कळकुंबे, मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, स्वच्छता दूत शारदा होशिंग आदींसह डॉक्टर, परिचारिका व हॉस्पिटलच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
बुथ हॉस्पिटलच्या कॅप्टन जयमाला साळवे, डॉ.मीना फुके, डॉ.चैतन्या मंडलिक, डॉ.अलिशा मंडलिक, सिस्टर सत्वशीला वाघमारे, लता वाघमारे, सुनिता पारखे, मीना दौंडे, कल्पना साळवे, विद्या साळवे, महिमा पारखे, संजीवनी भोंगाळे, निर्मला कंदारे, विमल जाधव, अश्विनी बोधक,
सिमरन घोडके, प्रेरणा वाघमारे, शालिनी कसबे, सपना चौहान, मारिया सोनवणे, नजमा आरिफ, शोभा जावळे यांचा उपस्थित सन्मान करण्यात आला. मेजर ज्योती कळकुंबे म्हणाल्या की, समाजाप्रती असलेले उत्तरदायित्व पुर्ण करण्यासाठी बुथ हॉस्पिटलने कोरोनाच्या महामारीत मानवसेवेचे निस्वार्थ भावनेने कार्य केले.
मनुष्यबळ व भौतिक सोयी-सुविधा कमी असून देखील जिद्दीने व कष्टाने कोरोना रुग्णांचे जीव वाचविले. मेजर देवदान कळकुंबे यांनी स्त्री ही एक शक्ती असून, अनेक भूमिका बजावून आपली जबाबदारी पार पाडत असते.
डॉ.सिमरन वधवा म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या संकटकाळात बुथ हॉस्पिटलने नागरिकांना मोठा आधार दिला. नागरिकांचे मनोधैर्य उंचावून, कोरोनाची भिती दूर करण्याचे काम केले. पाहुण्यांचे स्वागत मन्सूर शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी केले. आभार आफताब शेख यांनी मानले.