अहमदनगर Live24 टीम, 22 जून 2021 :- कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दीड वर्षाभरापासून सर्वांमध्ये भितीचे वातावरण होते. परंतु प्रशासन व सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून कोरोनावर मात करण्यात आपण आता यशस्वी होत आहोत. यामध्ये नगरमधील बुथ हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे.
कोरोना रुग्णांना उपचाराबरोबरच त्यांचे मनोबल वाढविण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून झाले आहे. येथील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी यांनी केलेल्या मनोभावे सेवेमुळे अनेक कोरोना रुग्ण बरे होऊन आनंदाने घरी गेले आहेत.
येथील सेवा कार्य हे मानवतेचे एक उत्तम उदाहरण आहे. या सेवेकरांच्या सन्मान करुन आपणा त्याच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत आहोत, असे प्रतिपादन जीवन मार्ग सत्य फौंडेशनचे अध्यक्ष बिपीन गायकवाड यांनी केले.
जीवन, मार्ग, सत्य फौंडेशनच्यावतीने बुथ हॉस्पिटलला सॅनेटाइझर, हायपो व मास्क देऊन डॉक्टर्स, कर्मचारी यांचा ‘कोवीड योध्दा’ म्हणून गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी अध्यक्ष बिपीन गायकवाड, संतोष फासे, सचिन साळवे जॉय सिंग,
दिपक तेलधुने व सभासद आदिंसह हॉस्पिटलचे मेजर देवदान कळकुंबे आदि उपस्थितीत होते. याप्रसंगी मेजर देवदान कळकुंबे म्हणाले, हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना चांगले उपचार मिळाव्यात यासाठी येथील सर्व डॉक्टर्स व कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
कोरोना काळात रुग्णामधील भिती कमी करुन त्यांना चांगले उपचार मिळाल्याने बरे झाले. हॉस्पिटलवर असलेला विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. फौंडेशनच्यावतीने हॉस्पिटलला केलेली मदत व सन्मान हा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
याप्रसंगी संतोष फासे म्हणाले, जीवन मार्ग सत्य फौंडेशन गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमाद्वारे कार्यरत असून, संस्थेच्यावतीने कोरोना काळातही गरजूंना मदत केलेली आहे.
आजही बुथ हॉस्पिटलच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छोटीशी मदत देऊन सन्मान केला आहे. संस्था यापुढेही असेच सामाजिक कार्यात आपले योगदान देईल, असे सांगितले.