अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- केंद्र पुरस्कृत व नाबार्ड मार्फत जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांना पशुपालक शेतकर्यांना खेळत्या भांडवलापोटी वाटप केलेल्या कर्जाची ज्यांनी फेड केली आहे, अशा कर्जदारांना पुन्हा कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बँकेच्या निवडणुकीनंतर सोमवारी नूतन संचाल मंडळाची पहिली मासिक बैठक सोमवारी खेळीमेळीच्या वातावरण बैठकीच्या मिटींग हॉलमध्ये पार पडली.
बैठकीत बँकेने केंद्र पुरस्कृत व नाबार्ड मार्फत जिल्ह्यातील बँकेच्या सभासदांना पशुपालक शेतकर्यांना खेळत्या भांडवलापोटी वाटप केलेल्या कर्जाच्या विषयावर चर्चा झाली.
या कर्जाची परतफेडीची तारीख 31 मार्च 2021 आहे. हे कर्ज व्याजासह वेळेत भरल्यास जिल्हा बँकेमार्फत या कर्जदार सभासदांना पुन्ह कर्ज उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर संचालक मंडळाने शिक्कामोर्हतब केला.
बँकेने सुरू असलेल्या वर्षात केंद्र पुरस्कृत व नाबार्ड यांचेमार्फत राबविण्यात आलेले योजनेत सभासद शेतकर्यांना गायी-म्हशी आणि पश खाद्यांसाठी कॅश क्रेडीट स्वरूपात 381 कोटीचे कर्ज वाटप केलेले आहे.
ही योजना अंमलात आणतांना शेतकर्यांना शेतकर्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी कालावधी कमी मिळाला. यामुळे या योजनेत जे शेतकरी वेळेत व्याजासह रक्कम भरणा करतील त्यांना 1 एप्रिलनंतर पुन्हा कर्ज देण्यात येणार आहे. नाबार्ड व केंद्र सरकार यांची ही योजना फक्त 31 मार्च 2021 पर्यतच आहे