अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- अवैधरित्या गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, चोरीच्या दोन दुचाक्यासह दोघांना बालमटाळी परिसरातील शेवगाव गेवराई रस्त्यावर एका हॉटेल समोर शेवगाव पोलिसांनी जेरबंद केले.
राहुल हिमतराव शितोळे (वय -१९ रा.बालमटाळी ता.शेवगाव), कुमार भानुदास शिंदे ( वय-२३ रा.पानेवाडी ता.घनसांगवी जि.जालना) असे त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरुन पो.कां.पी.बी.नाकाडे, किशोर शिरसाठ, प्रविण बागुल, दिलीप राठोड यांनी मंगळवारी बालमटाळी येथे शेवगाव गेवराई रस्त्यावरील हॉटेल स्वराज शेजारी वरील वर्णणाचे दोघेजन आढळून आले. मात्र पोलिसांना पाहताच ते पळून जावू लागले.
पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेवून शिंदे याच्याकडून गावठी बनावटीचा काळ्या व सिल्व्हर रंगाचा लोखंडी कट्टा, १ हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काडतुसे,
एक लाख रुपये किमतीची विनानंबरची बुलेट, ७५ हजार रुपमे किमतीची विनानंबरची पल्सर ताब्यात घेतली. दोन्ही दुचाक्या चोरीच्या असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल करीत आहेत.