दोघांना कपडे फाटेपर्यंत चोपले! आरोपीमध्ये एका महिलेचा देखील समावेश!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-तुझा बैल मला नको असे म्हटल्याचा राग येवून दोघांनी लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्याची घटना राहुर तालुक्यातील खडांबे येथे घडली.

या प्रकरणी राहुरी पोलिसांनी विठ्ठल शेटे व एका महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, संदेश ज्ञानदेव गायकवाड (वय २२ व्यवसाय रसवंती चालक) हा व त्याचा जोडीदार प्रकाश योसेफ सौदागर हे दोघेजन मोटारसायकलवरून उसाच्या चरखासाठी खडांबे येथे बैल पाहण्यासाठी जात होते.

दरम्यान त्यांनी विठ्ठल अशोक (शेटे रा.गोटुंबे आखाडा) याला खंडाबेकडे जाणारा रस्ता विचारला असता तो म्हणाला तुम्ही खडांबेला कशासाठी जात आहात.

गायकवाड यांनी चरखासाठी बैल पाहण्यासाठी जात असल्याचे सांगितले, त्यावरून शेटे म्हणाला मी तुम्हाला बैल दाखवतो. मात्र गायकवाड त्यास म्हणाला तुझा बैल मला नको,

असे म्हटल्याचा राग येवून शेटे व एका महिलेने गायकवाड व सौदागर या दोघांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत अंगावरील शर्ट फाडला.

याप्रकरणी गायकवाड व सौदागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेटे व एका महिलेविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोना.राठोड हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24