अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारे मुळाधरातुन तात्काळ भरून द्यावी अन्यथा कुठल्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
मुळा नदीकाठच्या कार्यक्षेत्रात दोन मंत्री आहेत राहुरी मतदार संघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि नेवासा मतदार संघात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे दोन मंञी असुनदेखील बंधारे कोरड कोरडेठाक का? असा संतप्त सवाल लाभधारक शेतक-यांमधुन केला जात आहे.
मुळा धरणात सध्या पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे त्यात मे महिण्याचा कडक उन्हाची तीव्रता अधिक आहे त्यामुळे नदीकाठ उजाड झालाय शेती,पिण्याचे पाणी,जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय.
पाणी सुटेल या आशेने शेतक-यांना बंधा-याच्या दुरूस्तीसाठी लाखौ रूपये लोकवर्गनीतुन जमा केलेत माञ पाणी सुटण्याची आशा धुसर झाल्याने शेतकरी संभ्रम्वस्थेत आहेत. तत्कालिन माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मात्र गेल्या काळात हे बंधारे भरले होते.
आता मात्र या काळात सुदैवाने दोन मतदार संघात दोन मंत्री आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे जलसंधारण खाते देखील शंकरराव गडाख यांच्याकडे आहे तरीदेखील या बंधाऱ्यात पाणी का सुटत नाही असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.
त्यामुळे या दोन्हीही मंत्री महोदयांनी या समस्येकडे लक्ष देऊन हे बंधारे तात्काळ भरावीत अशी मागणी दत्ताञय घोलप, कृपाचार्य जाधव,नानासाहेब जुंधारे,शिवाजी जाधव,युवराज पवार,श्रीराम तुवर,विठ्ठल जाधव,ब्रह्मदेव जाधव,
विठ्ठल जाधव, दादा राजळे, वैभव जरे,योगेश बनकर, राजू जंगले, विजय जंगले, संतोष नवगिरे, अशोक टेमक, विलास सैंदोरे, भाऊसाहेब विटनोर, आदींसह अंमळनेर करजगाव, पानेगाव, शिरेगाव, खेडले परमानंद,पिंप्री-वळण,
चंडकापुर ,केंदळ ,मानोरी ,वळण ,मांजरी,मानोरी,केंदळ ,आरडगाव आदि गावांमधील लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने हे बंधारे आठ दिवसात भरून देण्याची मागणी केली आहे.अन्यथा, तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.