अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-महामार्गाचे कामानिमित्त महामार्गावरील असलेले अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या शाखा अभियंत्यास शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आहे.
हा प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे घडला आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील बसस्थानकजवळ ओम बेकर्स अॅन्ड डेअरीसमोर
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६१ वरील अतिक्रमण काढत असताना दत्तात्रय हरीभाऊ जाधव याने आमच्या सहकाऱ्यांना व मला शिवीगाळ केली.
तसेच माझ्या दुकानासमोरील जागा तुमच्या बापाची आहे का? असे म्हणून सरकारी कामात अडथळा निर्माण करून लाथाबुक्क्यांनी व चापटीने मारहाण करून
परत जर येथे काम करण्यासाठी आले तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिल्याची फिर्याद शाखा अभियंता राजेंद्र शिवाजी कुलांगे यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली.
या फिर्यादीवरून दत्तात्रय हरीभाऊ जाधव (रा. चिचोंडी पाटील, ता. जि अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोहेकाॅ आर.एन. राऊत व मपोकाॅ संगीता बडे हे करीत आहेत.