मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या काही आमदारांना (MLA) घेऊन गुवाहाटी (Guwahati) मध्ये गेले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार संकटात आल्याचे दिसत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पहिल्यांदा नरमती भूमिका घेतल्याची दिसत होती.
मात्र आता उद्धव ठाकरे यांनी पक्ष कार्यकारिणीच्या बैठकीत मोठे निर्णय घेतल्याचे दिसत आहे. तसेच बंडखोर आमदारांना टोला देखील लगावला आहे. तसेच आमदारांना इशारा देखील देण्यात आलेले दिसत आहे.
शिवसेनेच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक (Meeting) मुंबईत पार पडली, त्यात उद्धव ठाकरेंना अनेक अधिकार देतानाच बाळासाहेब आणि शिवसेनेचे नाव इतर कुणालाही वापरू न देण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बैठकीत निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं असून, त्यामध्ये बाळासाहेब आणि शिवसेनेच्या नावाचा वापर करण्याचा अधिकार देऊ नये, असं म्हटलं आहे.
बैठकीत हे ठराव मंजूर झाला.
1 : शिवसेनेतील सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असतील.
2 : बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना ही नावे कोणीही वापरू शकत नाहीत.
3 : पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकारही पक्षप्रमुखांना असतील.
आतापर्यंत हे प्रस्ताव सर्वानुमते स्वीकारण्यात आले आहेत.
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल
सभेत उद्धव ठाकरे यांनी सेना भवनात शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्यावर आपण मोठी जबाबदारी दिली होती.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता मते मागून दाखवा. शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची होती आणि त्यांच्यासोबत राहील. शिवसेना मराठी अस्मिता आणि हिंदुत्वासाठी लढत राहील.
माझ्या वडिलांच्या नाही, तर तुमच्या वडिलांच्या नावाने मते मागून दाखवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले की, पूर्वी नाथ होते, पण आता दास झाले आहेत.