ब्रेकिंग न्यूज ! तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-तामिळनाडूमध्ये तेथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली असून त्यात 11 जण ठार झाले आहेत. विरुधुनगरमधील या कारखान्यात अचानक स्फोट झाला.

स्फोटानंतर आगीचा भडका उडाला आणि काही समजायच्या आताच आग पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेला फटाक्यांचा कारखाना तामिळनाडूतील विरुधुनगर जिल्ह्यातील साथूर जवळील अचनगुलाम परिसरात आहे.

यावेळी फटाके बनवण्यासाठी काही केमिकल्स एकमेकांत मिसळल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातानंतर कारखान्याला भीषण आग लागली.

ही आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या अपघात प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे.

त्यांनी या घटनेची माहिती देत, जखमी लोकं लवकर बरी व्हावीत यासाठी पंतप्रधानांनी प्रार्थना केली आहे. शिवाय पीडितांच्या मदतीसाठी एक टीम घटनास्थळी कार्यरत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

तसेच दुसऱ्या एका ट्वीटमध्ये त्यांनी पीडितांना मदतीची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी PMNRF कडून मृत व्यक्तींना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24