ब्रेकिंग न्यूज ! दारुड्या बापाने केला मुलाचा खून

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे दारुचे व्यसन असलेल्या बापाने आपल्या मुलाचाच खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नी ताराबाई हिने मुलाच्या हत्येबाबत आपल्या पतीविरुद्ध पोलिस स्‍टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की आखेगाव येथील गोरख किसन करपे या जन्मदात्या बापानेच सोमनाथ गोरख करपे ( वय -१८ ) या बारावीत शिकणाऱ्या आपल्या पोटच्या मुलाचा लोखंडी गजाने मंगळवार पहाटे साडेतीन वाजता शेतात ऊसाला पाणी देत असताना खून केला.

पत्नी ताराबाई हिने दारुच्या आहारी गेलेला पती गोरख याच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गोरख करपे हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे घरात कायम किरकोळ वाद होत होते. सोमवार दि .२९ रोजी नेहमी प्रमाणे गोरख दारू पिऊन घरी आला.

यावेळी पत्नी ताराबाई व त्यांच्या पतीमध्ये वाद झाला. पंरतु मुलगा सोमनाथ मध्ये आल्याने वाद मिटला. त्यावेळी गोरखने मुलाला शिवीगाळ केली व तो घरातून निघून गेला. त्यानंतर ताराबाई व मुलगा सोमनाथ हे दोघे जेवन करुन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास शेतात ऊसाला पाणी देण्यासाठी गेले.

पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास सोमनाथचा ओरडल्याचा आवाज आल्याने ताराबाई पळत त्याच्याकडे गेली असता, त्यावेळी गोरख हा मुलास डोक्यावर लोखंडी गजाने मारत असल्याचे तिने पाहिले. यावेळी सोमनाथ बांधावर खाली कोसळला. या मारहाणीत सोमनाथ गंभीर जखमी होऊण जागेवरच पडला.

यावेळी त्याच्या डोक्यातुन रक्त येत होतेही घटना समजल्याने शेजारीच पिकाला पाणी देत असलेले मुक्ता करपे, अंबादास जाधव, सतिश पायघन हे घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी सोमनाथला नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले , मात्र औषधोपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

मृत मुलाची आई ताराबाई हिने पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून, हे समजताच आरोपी फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकरे करीत आहेत .

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24