ताज्या बातम्या

Samsung Galaxy M13 5G : स्वस्तात घरी आणा Samsung Galaxy M13 5G, पहा फीचर्स आणि किंमत

Published by
Ahmednagarlive24 Office

Samsung Galaxy M13 5G : काही दिवसांपूर्वी Samsung Galaxy M13 5G हा स्मार्टफोन लाँच झाला होता. त्यानंतर यातील जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशनमुळे या स्मार्टफोनने संपूर्ण मार्केट गाजवलं होतं.

आता या स्मार्टफोनवर जबरदस्त सूट मिळत आहे. लाँच च्यावेळी या स्मार्टफोनची किंमत 15,999 रुपये इतकी होती. परंतु, तुम्ही आता तो स्वस्तात खरेदी करू शकता.

ऑफर

समसंगच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. तुम्हाला बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड ईएमआय व्यवहारांवर 10% म्हणजेच 2,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाऊ शकते. तसेच फेडरल बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यावर 10 टक्के म्हणजेच 3,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

त्याचबरोबर Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर 5 टक्के कॅशबॅक मिळण्याची शक्यता आहे. हा फोन 874 रुपये प्रति महिना EMI वर खरेदी केला जाऊ शकतो. हा फोन 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट 15,999 रुपयांमध्ये लॉंच केला होता. आता हा स्मार्टफोन 3,300 रुपयांनी स्वस्त म्हणजे 12,699 रुपयांना मिळत आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले असून रिझोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर दिल आहे.

तसेच स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज कंपनीने दिले आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येते. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाल्यास हा Android 12.0 वर आधारित One UI 4 वर काम करतो.

या फोनमध्ये पहिला कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आणि दुसरा कॅमेरा 2 मेगापिक्सलचा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास फोनमध्ये Wi-Fi, 5G आणि USB Type-C पोर्ट दिले आहेत. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी असून ज्याला 15W चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office