Vastu Tips : नवीन वर्षात घरी आणा ‘ही’ वस्तू, डबल होतील पैसे

Vastu Tips : नवीन वर्ष सुरु व्हायला अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत. 2022 हे वर्ष अनेकांना खूप त्रासदायक तर काहींना चांगले गेले असेल. परंतु, जर तुम्हाला 2023 हे वर्ष चांगले जावे असे वाटत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे.

नवीन वर्ष तुम्हाला सुख-समृद्धीचे आणि भरभराटीचे घालवायचे असेल तर नवीन वर्षात काही वस्तू घरी आणा.  तुम्हाला पैशांची कमतरता तसेच सर्व अडचणी दूर होऊन घरामध्ये समाधानाचं वातावरण राहील.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

ज्योतिषाचार्य पंडित रामदास यांच्या मतानुसार रविवारपासून नवीन वर्ष सुरू होत असून या दिवशी सर्वार्थसिद्धी योग आणि शिवयोग तयार होत आहेत. या दिवशी तुम्ही जर काही खास गोष्टी तुमच्या घरी आणल्या तर संपूर्ण वर्ष चांगले जाईल. कारण या वस्तू घरात ठेवल्या तर सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात आणि भाग्य जागृत होते.

यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा

1. पोपट

भारतीय शास्त्रांमध्ये पोपटाला बुद्धिमान आणि ज्ञानी पक्षी मानले गेले आहे. त्याशिवाय तो कोणत्याही वातावरणात राहतो. पोपटामध्ये शिकण्याची क्षमता खूप वेगवान असते. त्यामुळे तुमच्या घरात पोपट असेल तर खूप चांगले.

परंतु, जर तसे नसेल तर तुम्ही तुमच्या घरी पोपटाचे चित्र किंवा एखादा पुतळा आणू शकता. हे चित्र तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला लावा. असे केल्याने तुमच्या मुलांची अभ्यासात रुची वाढेल आणि घरातील दुःख, गरिबी, आजार दूर होतील.

2. चांदीचे नाणे

सर्वार्थसिद्धी योग असल्यानं त्या दिवशी चांदीचे नाणे खरेदी करा.धनत्रयोदशीला चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.या योगात चांदीची खरेदी केल्याने सौभाग्य प्राप्त होते. जर तुम्ही या दिवशी चांदीचे नाणे खरेदी केले तर तुम्हाला कधीही पैशांची गरज भासणार नाही.

3. शंख

सर्व हिंदू घरांमध्ये मंदिरात शंख ठेवले जातात. तरीही नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शंख खरेदी करून तुमच्या घरातील मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा. हा शंख आरतीच्या वेळी जरूर वाजवा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आर्थिक तंगी दूर होते. तसेच व्यवसायातही वाढ होते.

4. मोराचे पंख

मोराच्या पंखांमुळे सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर होतात. मोराचे पंख भगवान श्रीकृष्ण आणि गणेशाला अतिशय प्रिय आहे. तसेच ही पिसे आणत असताना हे लक्षात ठेवा की मेलेल्या मोराचे पिसे आणू नये. नाही तर ते तुमच्यासाठी अशुभ ठरते.