भाईचा बड्डे वाजले बारा ! मुकुंदनगर लसीकरण केंद्रातही वाढदिवस साजरा !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  अहमदनगर शहरात सध्या लसीकरण वादात आहे, एक कोरोना संकटात शहरातील नागरिकांचे कोरोना लसीकरण ‘राजकारणात’ सापडले आहे, आणि आरोप – प्रत्यारोप होत आहेत.

चक्क भाजपाच्या शहराध्यक्ष यांच्या मुलांनी लसीकरण केंद्रातील कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा केला आहे त्याचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. 

मनसेचे नितीन भुतारे यांनी हा प्रकार उघडीस आणला असून अजून एक धक्का आरोग्य विभागाला मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला असून अजून अनेक प्रकरणे महानगर पालिकेची उघड करणार असल्याचे नितीन भुतारे म्हणाले.   

सर्वसामान्यांवर कारवाई करुन हजारो रुपयांची दंड वसुल करायचा आणि दुसरीकडे राजकीय नेते , नगरसेवक त्यांचे मुले, नातेवाईक असे बेफान वागतात त्याकडे मात्र लक्ष्य नाही देणे हे चुकीचे असून 19 मे रोजी हा वाढदिवस साजरा केला 

सोशल डीस्टनसिंग , मास्क, कुठेच वापरलेले दिसत नाही त्यामुळे आरोग्य केंद्रात वाढदिवस साजरा करण्यात आल्यामुळे आयुक्तांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित भाजपा शहराध्यक्ष यांचे मुलासह सर्वांवर कारवाई करावी अशी मागणी नितीन भुतारे हे आयुकांकडे करणार आहेत. 

तसेच वाढदिवसाची ही मालिका सूरू करणाऱ्या आरोग्य अधिकारी डॉ अनिल बोरगे यांच्यावर सुध्दा कारवाईची मागणी मनसे  कडून वारंवार कारण्यात येत आहे.

नगरसेवक, राजकिय नेते लसीकरण केंद्र ताब्यात घेत आहेत ह्या मनसेच्या नितीन भुतारे यांनी केलेले आरोप कुठे तरी अश्या घटनांमुळे सिध्द होताना दिसत आहे

अहमदनगर लाईव्ह 24