Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

BSNL Recharge Plan : BSNL चा अप्रतिम रिचार्ज प्लॅन! 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतोय जिओ, Vi आणि एयरटेल पेक्षा जास्त सुविधा

BSNL च्या ग्राहकांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण कंपनी आता आपल्या ग्राहकांसाठी एक भन्नाट रिचार्ज प्लॅन ऑफर करत आहे.

BSNL Recharge Plan : BSNL ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या प्लॅनच्या किमती या खूपच कमी असतात. ग्राहकांच्या बजेटचा विचार करून कंपनी रिचार्ज प्लॅनच्या किमती ठरवत असते. त्यामुळे कंपनी सतत खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, Vi आणि एयरटेलला जोरदार टक्कर देत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असाच एक कंपनीचा रिचार्ज प्लॅन आहे जो या सर्व खासगी टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आहे. कंपनीच्या या 400 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असणाऱ्या या प्लॅनमध्ये Airtel आणि Voda पेक्षा दुप्पट वैधता मिळत आहे.

जाणून घ्या जिओचा 349 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची ऑफर

जिओच्या 349 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल तसेच 100 SMS दररोज मिळत आहेत. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अतिरिक्त फायदे म्हणून, Jio अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळत आहे.

जाणून घ्या बीएसएनएलचा 397 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची ऑफर

BSNL च्या या प्रीपेड प्लॅनची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. 397 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 60 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल तसेच दररोज 100 SMS मिळत आहेत. कंपनीच्या या प्लॅनमध्ये अतिरिक्त फायदे म्हणून इनकमिंग कॉलची सुविधा 200 दिवसांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्हाला तुमचे दुसरे सिम सक्रिय ठेवायचे असल्यास हा प्लॅन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.

जाणून घ्या एअरटेलचा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची किंमत

एअरटेलच्या 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दिवसाला 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS दररोज मिळत आहेत. यात अतिरिक्त फायदे म्हणून, या वापरकर्त्यांना डिस्ने प्लस हॉटस्टार मोबाईलचे ३ महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.

जाणून घ्या Vi चा 399 रुपयांचा प्रीपेड प्लॅनची किंमत

Vodafone-Idea चा हा प्रीपेड प्लॅनच्या फायद्यांबाबत बोलायचे झाले तर वर नमूद करण्यात आलेल्या Airtel च्या प्लॅन सारखाच आहे. Vi च्या 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2.5GB डेटा, अमर्यादित कॉल, दररोज 100 SMS आणि अतिरिक्त फायदे म्हणून, 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे.