BSNL Recharge Plan : भारतात एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडिया या प्रमुख खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. तर भारत संचार निगम लिमिटेड एक सरकारी टेलिकॉम कंपनी असून या कंपनीच्या ग्राहकांनाची संख्या खूप जास्त आहे.
कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन आणि खिशाला परवडणाऱ्या योजना आणत असते. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. दरम्यान, कंपनीने आताही आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे. जो इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा उत्तम फायदे देतो. कंपनीचा शानदार हा प्लॅन किती रुपयांचा आहे आणि त्यात कोणते फायदे मिळतील, जाणून घेऊयात सविस्तर.
107 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन
सर्वात अगोदर या प्लॅनच्या वैधतेबद्दल बोलायचे झाले तर BSNL च्या 107 रुपयांच्या शानदार रिचार्ज प्लॅनची वैधता एकूण 35 दिवसांची आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये ग्राहकांना 3GB डेटा मिळत असून या प्लॅनची खासियत म्हणजे हा प्लॅन कंपनीच्या सर्वात स्वस्त प्लॅनपैकी एक आहे.
रिचार्ज प्लॅनची डेटा मर्यादा संपल्यानंतर, त्याची गती मर्यादा 40kbps पर्यंत कमी होते. सर्वात महत्त्वाचे कंपनीचा हा प्लॅन एका महिन्यापेक्षा जास्त कालावधीची वैधता देतो. तसेच कंपनीच्या वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये 200 मिनिटांची मोफत व्हॉईस कॉल सेवा मिळते. याशिवाय या प्लॅनमध्ये बीएसएनएल ट्यून्स सेवादेखील 35 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे.
बीएसएनएलचा सर्वोत्तम रिचार्ज प्लॅन
हे लक्षात घ्या की ही बीएसएनएलचा हा प्लॅन त्या ग्राहकांसाठी उपयुक्त ठरेल जे कमी किमतीत आपले सिम सक्रिय ठेवण्यासाठी प्लॅन शोधत आहेत. या प्लॅनमध्ये 200 मिनिटे कॉलिंग मोफत उपलब्ध असून हा प्लॅन तुमचे सिम 35 दिवसांसाठी सक्रिय ठेवेल.
हे या प्लॅनचे मुख्य वैशिष्ट्य आहे. समजा तुम्ही कमी डेटासह स्वस्त प्लॅन शोधत असल्यास तर हा प्लॅन तुम्हाला मदत करू शकतो. हे लक्षात घ्या की कंपनीचा हा 107 रुपयांचा प्रीपेड प्लॅन असून जो 99 रुपयांच्या प्लॅनपेक्षा खूप चांगला आहे.