Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

BSNL Recharge Plan : बीएसएनएलचा सर्वात सुपरहिट प्लॅन! अवघ्या 107 रुपयांत मिळवा 40 दिवस इंटरनेटसह अनेक फायदे

बीएसएनएलने एक शानदार रिचार्ज प्लॅन आणला आहे. यात ग्राहकांना अनेक भन्नाट फायदे देखील मिळत आहेत.

BSNL Recharge Plan : देशात सरकारी तसेच खासगी टेलिकॉम कंपन्या आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या सतत नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपन्या ग्राहकांसाठी पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच बीएसएनएल या सरकारी टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी असाच एक प्लॅन आणला आहे. ज्याची किंमत 107 रुपये इतकी आहे. कंपनीचे इतरही अनेक प्लॅन आहेत. जे ग्राहकांच्या बजेटमध्ये येत आहे. इतकेच नाही तर कंपनीच्या या प्लॅनमध्ये केवळ इंटरनेट नाही तर इतर सुविधा मिळत आहेत.

जाणून घ्या सर्व प्लॅन

बीएसएनएलचा 105 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलचा 105 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 18 दिवसांच्या वैधतेसह येत आहे. तुम्हाला यात अनलिमिटेड व्हॉईस कॉल मिळत असून 2GB डेटा देखील उपलब्ध होत आहे.

बीएसएनएलचा 107 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

बीएसएनएलचा हा 107 रुपयांचा प्लॅन 40 दिवसांच्या वैधतेसह येत आहे. यात 3GB डेटा, 200 मिनिटे व्हॉईस कॉल आणि 40 दिवस BSNL Tunes मिळतात.

बीएसएनएलचा 153 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी ग्राहकांना अमर्यादित कॉल आणि 1GB डेटा प्रतिदिन देण्यात येत आहे. तसेच यात तुम्हाला दररोज 100 SMS आणि तुम्हाला 26 दिवसांसाठी BSNL Tunes मिळतात.

197 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

197 रुपयांचा एक्स्टेंशन पॅक 84 दिवसांसाठी वैध असून 80Kbps पर्यंत स्पीड कमी करून अमर्यादित कॉल्स, 100 एसएमएस प्रतिदिन आणि 2GB डेटा प्रतिदिन ऑफर करत आहे. यात तुम्हाला झिंग अॅपमध्ये प्रवेश मिळत आहे जो फक्त पहिल्या 18 दिवसांसाठी वैध असणार आहे.

199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

कंपनीचा हा पॅक 30 दिवसांसाठी वैध असून यात तुम्हाला दररोज 2GB डेटा (त्यानंतर 80Kbps), अमर्यादित व्हॉइस कॉल आणि 100 SMS/दिवस मिळत आहे, जो रोमिंगमध्ये पाठवण्यात येतो.