BSNL Recharge Plan : टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. या कंपन्या आपल्या ग्राहकांना डेटासह अनेक भन्नाट फायदे देत असतात. असाच एक रिचार्ज प्लॅन BSNL ने आणला आहे.
BSNL ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. ज्याची किंमत 400 रुपयांपेक्षा कमी आहे. ज्याची वैधता 6 महिन्यांसाठी असणार आहे. या प्लॅनची किंमत कमी आहे त्यामुळे हा प्लॅन जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या दिग्ग्ज टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देत आहे.
MTNL आणि BSNL या सरकारी टेलिकॉम कंपन्या अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात. यापैकी एक म्हणजे BSNL च्या प्लॅन्स खूप कमी किमतीत येतात आणि यात जास्त फायदेही मिळत आहेत. सध्या या कंपनीकडे 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीचा असा एक रिचार्ज प्लॅन आहे जो 6 महिन्यांच्या वैधतेसह येतो.
सर्वात स्वस्त दीर्घकालीन वैधता रिचार्ज प्लॅन
बीएसएनएलच्या या प्लॅनची किंमत 397 रुपये आहे. कमी किमतीत या प्लॅनमध्ये अनेक ग्राहकांना मिळतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 150 दिवसांची म्हणजेच 6 महिन्यांपर्यंत वैधता उपलब्ध होते. तुम्हाला 150 दिवसांसाठी प्लॅनमध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.
397 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
बीएसएनएलच्या 397 रुपयांच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळत आहे. यासाठी ग्राहकांना दर 60 दिवसांनी व्हाउचर रिफिल करावे लागणार आहे. यानंतर, त्यांना अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ घेता येणार आहे.
399 रुपयांचा प्लॅन
तसेच ग्राहकांना यात BSNL चा 399 रुपयांचा प्लॅन मिळत आहे. या प्लॅनची वैधता 180 दिवसांची असून हा प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर करतो. यात ग्राहकांना 80 दिवसांनंतर व्हाउचर रिफिल करावे लागणार आहे. यात दररोज 1 जीबी डेटाची सुविधाही उपलब्ध होणार असून डेटा संपल्यानंतर, ग्राहक 40 Kbps पर्यंतच्या वेगाने इंटरनेट वापरण्यास सक्षम असणार आहेत.