चोरटयांनी शेतकऱ्यांवर झाडल्या गोळ्या; आमदार पवारांच्या तालुक्यातील खळबळजनक प्रकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-चोरी, लुटमारी करून मारहाण करून चोरटे पसार झाल्याच्या अनेक घटना याआधीही घडल्या आहेत.

मात्र या प्रकरणात चोरटयांनी चक्क शेतकऱ्यांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.

या घटनेत खंडू गरड (वय ५०) वर्ष व भरत बर्डे (वय ३५ ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कर्जत तालुक्यातील निंबोडी या गावामध्ये शुक्रवारी मध्यरात्री तिघे चोरटे आले होते.

त्यांनी प्रदीप गरड यांची शेळी चोरून घेऊन जात असताना प्रदीप गरड जागे झाले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर इतर नातेवाईकही जागे झाले.

त्यावेळी तीन चोरट्यांनी शेळी घेऊन धूम ठोकली. या वेळी आरडाओरड एकूण शेजारी जागे झाले.

त्यातील सहा जणांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. बापूराव गरड यांनी मोटारसायकलवर बसलेल्या तिघांपैकी मागे बसलेल्या चोरट्याला पकडले.

आपण पकडले जाऊ याची भीती बाळगत मोटारसायकलवर मध्यभागी बसलेल्या चोरट्याने आपल्या गावठी कट्ट्यातून पाठलाग करणाऱ्या दोघांवर गोळीबार केला.

यामध्ये खंडू गरड व भरत बर्डे हे गंभीर जखमी झाले. या दोघांना उपचारासाठी नगर येथे रुग्णालयात हलविले आहे. या बाबत माहिती कळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव घटनास्थळी दाखल झाले.

बापूराव गरड यांच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24