वाळूतस्कराची सरपंचासह ग्रामस्थांना दमबाजी; ग्रामस्थ आक्रमक!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :-  अवैध वाळूचे वाहन अडवल्यामुळे वाळूतस्कराने थेट संरपच व ग्रामस्थांना दमबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यावेळी ग्रामस्थ व वाळू तस्करांमध्ये बाचाबाची झाल्यामुळे वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले होते.

दिवसेंदिवस प्रवरा नदीपात्रातून वाढत चाललेल्या वाळूतस्करीला प्रशासनाने आळा घालण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रकार संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे घडला.

रात्रीच्या वेळी अवैध वाळूतस्करी करणारे वाहन सरपंच सतिष जोशी यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पकडले.

हे वाहन तलाठी व पोलिसांच्या ताब्यात दिले असून, आश्वी पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या कारवाईत १ ब्रास वाळू ४ हजार रुपये व १ लाख रुपये किंमतीचे वाहन असा १ लाख ४ हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24