अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कर्जत परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होणार आहे.
कर्जत येथील विशाल नारायण दळवी यांनी फिर्याद दिली की, राहत्या घरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून 10,000 किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल व रोख 2000/रुपये चोरून नेले.
सदर गुन्ह्याचा शोध घेण्याकरिता कर्जत पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी अधिकारी व पोलीस अंमलदार यांना सूचना व मार्गदर्शन करून गुन्हा उघड करण्याबाबत आदेशीत केले होते.
तपास चालू असताना सदरचा गुन्हा हा श्रीगोंदा येथील आरोपींनी गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून दिनांक २० एप्रिल रोजी रोजी विकी विश्वास काळे, (रा. श्रीगोंदा )यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले असून
त्याचेकडून गुन्ह्यात गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे, तसेच त्याचा जोडीदार नंदया पायथ्या पवार(रा.श्रीगोंदा) यास दिनांक 24 रोजी श्रीगोंदा येथूनच अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी श अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,
सपोनी सुरेश माने, पोलीस जवान अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनील खैरे यांनी केली असून पुढील तपास पोलीस हवालदार सलीम शेख हे करत आहेत.