अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जामखेडमध्ये चोरट्यांनी भरदिवसा बंद असलेल्या घराचे कशाने तरी कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख १४ हजार ७०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील नान्नज येथील गोपाळपुरी वस्ती येथील हनुमंत कल्याण गाडेकर यांच्या बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी तोडून घरात घुसले.
नतर घरातील सर्व साहित्याची उचकापाचक करून लोखंडी कपाटात ठेवलेले १० ग्रॅमचा सोन्याचा नेकलेस, १० ग्रॅमच्या दोन पिळ्याच्या अंगठ्या,
५ ग्रॅमचे सोन्याचे झुबे,७ ग्रॅमची बोरमाळ,सोन्याची अंगठी,६ ग्रॅमचे गंठण, मोठे २५ ग्रॅमचे सोन्याचे गंठण व काही रोख रक्कम असा एकूण १ लाख १४ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याप्रकरणी गाडेकर यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोसई राजू थोरात हे करत आहेत.