अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- कोरोनाचा काळ सुरु असून जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. यातच या काळात जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे.
नुकतेच राहाता तालुक्यातील रूई हद्दीत चोरट्यांनी रुई-सावळीविहीर रस्त्यावर असणार्या म्हसोबा मंदिर नजीक तीन घरांवर घरफोडी करत 5 तोळे सोन्यासह रोख दहा हजार रुपये लंपास केले आहे.
याबाबत केशव सुर्यभान आहिरे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा
तोडत घरातील सामान उचका पाचक करून रोख रक्कमेसह सोने लंपास केले. शेजारील दोन घरातही चोरट्यांनी कुलूप तोडले परंतु तेथे कुणी रहात नसल्याने घरात काही मिळाले नाही. दरम्यान घटनेची खबर मिळताच शिर्डी पोलिस ठाण्याचे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.