नोकरीपेक्षा भारी व्यवसाय; 50 हजाराची मशीन खरेदी करून सुरू करा ‘हा’ बिजनेस, लाखो रुपयात होणार कमाई

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : अलीकडे नोकरी ऐवजी व्यवसायाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. विशेषता कोरोना काळापासून व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात यामुळे नोकरीवरील विश्वास आता कमी झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसात जगभरातील अनेक नामांकित कंपन्यांनी आपल्या कंपनीतून नोकर कपात केली आहे.

अमेझॉन, फेसबुक, ट्विटर यांसारख्या अनेक नामांकित कंपन्यांनीच आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ दिला असल्याने नोकरी करणाऱ्यांमध्ये सध्या कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. यामुळे काहींनी तर नोकरी सोडून व्यवसायात आपले नशीब आजमावले आहे. तर काही लोकांच्या नोकऱ्या गेल्यात यामुळे असे लोक नाईलाज म्हणून व्यवसायात आले आहेत.

मात्र जे लोक नवीन व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांना कोणता व्यवसाय करावा हे सुचत नाही. म्हणून आज आपण कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरू होऊ शकतो? याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपण अशा एका बिजनेसबद्दल जाणून घेणार आहोत जो बिझनेस मात्र 50 हजाराच्या गुंतवणुकीत देखील सुरू होऊ शकतो.

कोणता आहे तो व्यवसाय

आम्ही ज्या व्यवसायाबद्दल बोलत आहोत तो व्यवसाय आहे मसाल्याचा. भारतीय घरांमध्ये मसाल्यांना नेहमीच मागणी असते. यामुळे जर तुम्ही काही चांगला आणि फायदेशीर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर मसाल्यांचा व्यवसाय तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही भरपूर कमाई करू शकणार आहात. हा व्यवसाय हा दोन पद्धतीने केला जाऊ शकतो.

जर तुम्ही शेतकरी असाल तर मसाला पिकांची शेती करून उत्पादित झालेल्या शेतमालावर प्रक्रिया करून मसाला तयार करू शकता आणि तयार झालेल्या उत्पादनाला बाजारात विकू शकता. पण जर तुम्ही शेतकरी नसाल तर अशा परिस्थितीत कच्चा माल शेतकऱ्यांकडून किंवा बाजारातून खरेदी करून तुम्ही मसाला बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

पण हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काही गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये व्यवसायासाठी तुम्हाला थोड्याशा जागेची गरज भासणार आहे. मात्र लक्षात ठेवा की जागा ही रस्त्याच्या कडेला असावी. विशेष म्हणजे जागा गर्दीच्या ठिकाणी असावी. बाजारपेठेत जागा असेल तर अतिउत्तम. बाजारपेठेत नेहमीच गर्दी असते यामुळे तुमच्या व्यवसायाला प्रचाराची आणि प्रसाराची गरज राहणार नाही. जर तुमचे घर बाजारपेठेतच असेल तर तुम्ही घरातूनच हा व्यवसाय सुरू करू शकता.

मशीन्सची गरज भासेल

या व्यवसायासाठी ज्याप्रमाणे जागा महत्त्वाची आहे त्याप्रमाणे या व्यवसायासाठी काही मशीन्स सुद्धा आवश्यक राहणार आहेत. मसाले तयार करण्यासाठी तुम्हाला काही मशीन्सची आवश्यकता भासेल. जर तुम्ही हा व्यवसाय छोट्या स्तरावर सुरू करणार असाल तर तुम्ही मसाले मिक्सरनेही बारीक करू शकता. पण जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या स्तरावर सुरु केला तर तुम्हाला काही मशिन्स खरेदी करावी लागतील. जसे की, क्लिनर, ड्रायर, ग्राइंडर, स्पेशल पावडर ब्लेड, बॅग सीलिंग मशीन इ. मशीनची आवश्यकता भासणार आहे.

किती कमाई होणार

जाणकार लोकांच्या मते हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुरुवातीला 50 हजारापासून ते एक लाख रुपयांपर्यंतचे भांडवल गुंतवावे लागणार आहे. मात्र एकदा की हा व्यवसाय सुरू झाला आणि चांगला सेल वाढू लागला तर या व्यवसायातून 25 ते 30 हजार रुपये प्रति महिना पर्यंत सहजतेने कमाई होऊ शकते. कमाईचा हा आकडा सर्वस्वी सेल वर आधारित राहणार आहे. म्हणजेच जेवढी तुमची विक्री वाढेल तेवढाच तुम्हाला या व्यवसायातून नफा मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office