ताज्या बातम्या

Business Idea : फक्त सकाळ आणि संध्याकाळी करा हा व्यवसाय ! थोड्याच दिवसांत व्हाल करोडपती

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : सध्या प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी व्यस्त आहे. कोण नोकरी करून पैसे कमवत आहेत तर कोण व्यवसाय करून पैसे कमवत आहे. प्रत्येकाचे पैसे कमावण्याचे साधन वेगवेगळे आहे. पण नोकरी करून जास्त पैसे मिळत नसल्याने अनेकजण व्यवसायाच्या शोधात आहेत.

तुम्हालाही व्यवसाय करू चांगले पैसे कमवायचे असतील तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. कारण तुमच्यासाठी आसा एक व्यवसाय आणला आहे जो करून तुम्ही महिन्याला लाखो रुपये सहज कमवू शकता. तुम्ही म्हशींचे पालन करून दुग्धव्यवसाय सुरु करू शकता. यामधून तुम्ही दरमहा चांगली कमाई करू शकता.

म्हशीच्या जातींमध्ये मुर्राह जातीच्या म्हशी सर्वोत्तम मानल्या जातात. या जातीच्या म्हशींना सर्वात जास्त मागणी आहे. मुर्राह जातीच्या म्हशींना विषयच महत्व देखील आहे. या म्हशी शरीराने मजबूत असतात. तसेच इतर म्हशींच्या तुलनेत त्या चांगले दूध देतात.

मुर्राह म्हशी कशी ओळखायची?

तुम्हाला हा म्हशींचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही म्हशींची जात पाहूनच त्या खरेदी कराव्यात. मुर्राह जातीच्या म्हशीचा रंग काळा असतो. तसेच डोक्याचा आकार खूपच लहान असतो.

मुर्राह म्हशींची शेपटी इतर म्हशीपेक्षा वेगळी असते. म्हशीच्या शेपटी देखील मोठी असते. या म्हशीचे वजन देखील जास्त असते. हरियाणा आणि पंजाबसारख्या भागात या म्हशी मोठ्या प्रमाणात आढळून येतात.

मुर्राह म्हशीपासून भरघोस उत्पन्न मिळवा

गायीच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध महाग असते. तसेच त्याला मागणी देखील चांगली आहे. मुर्राह जातीच्या म्हशी पाळून तुम्ही दरमहा चांगली कमाई करू शकता. या जातीची एक म्हैस 20 लिटर दूध देते. इतर म्हशीच्या तुलनेत ही म्हैस दुप्पट दूध देते. चंगळ चारा आणि व्यवस्थित काळजी घेतल्यास ही म्हैस 30-35 लिटर दूध देऊ शकते.

मुर्राह जातीच्या एका म्हशींची किंमत एक लाख ते तीन ते चार लाखांपर्यंत आहे. तुम्ही देखील म्हशीच्या दुधाचा व्यवसाय सुरु करून दरमहा चांगली कमाई करू शकता. गायीच्या दुधाच्या किमतीपेक्षा म्हशीच्या दुधातून तुम्ही दुप्पट कमाई करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office