ताज्या बातम्या

Business Idea : 90 टक्के कर्ज मिळवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, बाजारात आहे मोठी मागणी; जाणून घ्या सविस्तर

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : तुम्ही जर स्वतःचा व्यवसाय सुरु करणार असाल तर तुच्य्साठी आज एक चांगल्या व्यवसायाची कल्पना आम्ही घेऊन आलो आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप कमी पैसे लागतील. तसेच या व्यवसायाला बाजारात मोठी मागणी असते.

आम्ही तुम्हाला पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटबद्दल सांगत आहोत. पोहे हे पौष्टिक अन्न मानले जाते. हे बनवायला आणि पचायला दोन्ही सोपे आहे. त्यामुळेच पोह्यांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे.

हिवाळा असो किंवा उन्हाळा, लोक दर महिन्याला ते मोठ्या आवडीने (चवीने) खातात. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. अशा परिस्थितीत तुम्ही पोहे उत्पादन युनिट सुरू करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता.

या व्यवसायासाठी लागणार खर्च

खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या (KVIC) प्रकल्प अहवालानुसार, पोहा उत्पादन युनिटची किंमत सुमारे 2.43 लाख रुपये आहे. यामध्ये तुम्हाला 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळेल. अशा परिस्थितीत पोहा मॅन्युफॅक्चरिंग युनिटचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 25,000 रुपयांची व्यवस्था करावी लागेल.

महत्वाच्या वस्तू

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सुमारे 500 चौरस फूट जागा आवश्यक आहे. पोहे मशीन, भट्टी, पॅकिंग मशीन आणि ड्रमसह लहान वस्तू आवश्यक असतील. या व्यवसायाच्या सुरुवातीला काही कच्चा माल आणा, नंतर हळूहळू त्याचे प्रमाण वाढवा. अशा प्रकारे, तुम्हाला चांगला अनुभव मिळेल आणि व्यवसाय देखील वाढेल.

कर्ज मिळेल

KVIC च्या या अहवालानुसार, जर तुम्ही प्रकल्प अहवाल तयार केला आणि ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज केला तर तुम्हाला सुमारे 90 टक्के कर्ज मिळू शकते. ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी KVIC कडून दरवर्षी कर्ज दिले जाते. तुम्हीही याचा लाभ घेऊ शकता.

कमाई

प्रकल्प अहवालानुसार प्रकल्प सुरू केल्यानंतर कच्चा माल घ्यावा लागतो. त्यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च येणार आहे. याशिवाय 50,000 रुपये इतरत्र खर्च केले जातील.

अशा प्रकारे सुमारे 1000 क्विंटल पोह्याचे उत्पादन होईल. ज्यावर उत्पादन खर्च 8.60 लाख रुपये येईल. तुम्ही 1000 क्विंटल पोहे सुमारे 10 लाख रुपयांना विकू शकता. म्हणजेच तुम्ही जवळपास 1.40 लाख रुपये कमवू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office