ताज्या बातम्या

Business Idea : कमी गुंतवणुकीत जास्त फायदा! आजच सुरु करा ‘हा’ जास्त मागणी असणारा व्यवसाय

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea : जर तुम्ही नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता जास्त मागणी असणारा व्यवसाय सुरु करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही.

कमी गुंतवणुकीत तुम्ही जास्त नफा मिळवून देणारा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही आता कमी खर्चात ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. समजा तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला सरकार कोणत्याही हमीशिवाय कर्ज देईल.

अगोदर करावे लागणार रजिस्ट्रेशन

ब्रेड हे एक लोकप्रिय खाद्यपदार्थ असून सर्वात अगोदर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला नोंदणी करावी लागणार आहे. तुम्हाला FSSAI कडून फूड बिझनेस ऑपरेशन लायसन्ससाठी अर्ज करावा लागणार आहे.

गरजेचे आहे हे साहित्य:

  • गव्हाचे पीठ किंवा मैदा
  • सामान्य मीठ
  • साखर
  • पाणी
  • बेकिंग पावडर किंवा यीस्ट
  • ड्राय फ्रुट
  • दुधाची भुकटी

करावी लागणार इतकी गुंतवणूक

जर तुम्हाला या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मोठा निधी गुंतवावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला एक छोटा कारखाना उभारावा लागणार आहे. ज्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तसेच तुम्हाला किमान 1,000 स्क्वेअर फूट जागाही लागणार असून ज्यात तुम्हाला हा कारखाना सुरू करता येईल.

किती होईल फायदा

एक पॅकेट बनवून त्याचे पॅकेजिंग करून तुम्हाला कमीत कमी 30% नफा मिळेल. सध्याच्या काळात ब्रेडच्या एका पॅकेटची किंमत 40 ते 60 रुपयांच्या आसपास आहे. त्यामुळे तुम्ही तुम्ही प्रत्येक महिन्याला लाखोंची कमाई करू शकता. प्रत्येकाच्या घरात ब्रेडचा वापर नाश्त्यासाठी करण्यात येतो. तसेच अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठीही ब्रेडचा उपयोग होतो. त्यामुळे जर तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल.

Ahmednagarlive24 Office