Business Idea : शेतकऱ्यांनो.. ‘या’ झाडाची लागवड करा आणि करोडपती व्हा! देश-विदेशात आहे खूप मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : तुम्ही आता शेतीतून खूप पैसे कमावू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासाठी कोणत्याही ट्रेनिंगची गरज पडत नाही. तुम्ही कोणत्याही ट्रेनिंगशिवाय शेती करू शकता. जर तुम्ही चिनाराच्या झाडांची लागवड केली तर तुम्हाला खूप जास्त कमाई करता येईल.

आज शेतकरी या झाडांची लागवड करून करोडो रुपये कमावत आहेत. फक्त देशातच नाही तर परदेशातही याला प्रचंड मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या झाडाचे लाकूड वेगवेगळ्या कामांसाठी वापरण्यात येते.

चिनार वृक्षांची लागवड फक्त भारतातच नाही तर जगाच्या अनेक भागात करण्यात येते. आशिया, उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशांमध्ये चिनार वृक्षांची लागवड केली जाते. या झाडाचा वापर कागद, हलके प्लायवूड, चॉप स्टिक्स, पेटी, माचीस इत्यादी बनवण्यासाठी केला जातो.

या तापमानात झाडांची होते वाढ

खरं तर, चिनार झाडाच्या लागवडीसाठी पाच अंश सेल्सिअस ते 45 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. इतकेच नाही तर तुम्ही या झाडाच्या मध्यभागी ऊस, हळद, बटाटा, धणे आणि टोमॅटो यांचे पीक घेऊन जास्तीत जास्त कमाई करू शकता.

तसेच तुम्ही ज्या ठिकाणी भरपूर बर्फवृष्टी होत असणाऱ्या ठिकाणी ही या झाडांची लागवड करता येत नाही. लागवडीसाठी, शेतातील माती 6 ते 8.5 pH दरम्यान असणे गरजेचे आहे. समजा तुम्ही चिनाराची झाडे लावल्यास एका झाडापासून दुस-या झाडाचे अंतर 12 ते 15 फूट इतके असावे हे लक्षात ठेवा.

किती होते कमाई?

या लोकप्रिय झाडांपासून तुम्हाला बंपर कमाई करता येईल. या झाडाच्या लाकडाची 700 ते 800 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री केली जात आहे. हे लाकूड 2000 रुपयांपर्यंत सहज विकले जाते. एक हेक्टरमध्ये 250 झाडे लावता येत असून जमिनीपासून झाडाची उंची एकूण 80 फूट इतकी असते. तुम्ही 7 ते 8 लाख रुपये सहज कमावू शकता. उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील शेतकरी सध्या या झाडाची लागवड करत असल्याने या शेतकऱ्यांना उसापासून जास्त उत्पन्न मिळत आहे.