Business Idea : सध्या असे अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही अगदी घरबसल्या सुरु करू शकता. तसेच तुम्हाला या व्यवसायासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची गरज पडणार नाही. कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय तुम्ही हा व्यवसाय घरी बसून सुरु करू शकता.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या व्यसायासाठी केंद्र सरकार मदत करत आहे. तुम्ही आता पीएम मुद्रा योजनेद्वारे सहजपणे कर्ज घेऊ शकता. परंतु यासाठी तुम्हाला जमीन घ्यावी लागणार आहे. तुम्ही या जागेत व्यवसाय सुरु करून बक्कळ पैसे कमावू शकता.
ज्याप्रकारे देशात लोकांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत सतर्कता वाढत असल्याने ओटमीलची मागणी भविष्यातही कायम राहू शकते. कॅलरीजचा मुख्य स्त्रोत असणाऱ्या गव्हापासून ओटमील तयार करण्यात येतो. यात काही प्रोटीन असून जे आपल्या स्नायूंसाठी खूप महत्वाचे असतात.
ओटमील कसा बनवतात
ओटमीलचा कच्चा माल गहू हा आहे. सर्वात अगोदर गहू पाण्यात धुण्यात येतो आणि नंतर तो 5-6 तास पाण्यात सोडला जातो. गहू मऊ होऊन उगवतो. आता ते सुकविण्यासाठी तुम्हाला तो उन्हात ठेवावा लागणार आहे. वाळल्यानंतर तो गहू पिठाच्या गिरणीत कुस्करण्यात येतो. हा कोंडा लापशीपासून वेगळा केला जात नाही.
घेता येते कर्ज
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने प्रधानमंत्री ग्रामोद्योग रोजगार योजनेअंतर्गत ओटमील उत्पादन युनिट स्थापन करण्याचा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. हाप्रकल्प अहवालानुसार ओटमील उत्पादन युनिट उभारण्यासाठी एकूण 2.40 लाख रुपये खर्च येईल. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी निधी नसेल तर, तुम्ही पीएम मुद्रा योजनेद्वारे कर्ज घेऊ शकता. या प्रकल्प अहवालाच्या आधारे तुम्ही बँकेकडून कर्जासाठी अर्ज करू शकता.
खर्च आणि कमाई किती? जाणून घ्या
ओटमील बनवण्यासाठी आणि विकायला जास्त खर्च येत नाही. यासाठी तुम्हाला जमीन घ्यावी लागणार आहे. जर तुमच्याकडे स्वतःची जमीन नसल्यास तुम्ही ती भाड्याने घेऊ शकता. त्यानंतर त्या जमिनीवर शेड बांधावे लागेल. 500 स्क्वेअर फूट जागेवर तुम्हाला 1 लाख रुपयांमध्ये शेड बांधता येईल. तसेच कारखान्याच्या उपकरणासाठी एक लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच तुम्हाला खेळत्या भांडवलासाठी 40,000 रु. म्हणजेच, कारखाना सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण 2,40,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे .
प्रकल्प अहवालानुसार 100 टक्के क्षमता वापरून उत्पादन केले तर वार्षिक उत्पादन 600 क्विंटल होईल. 1,200 रुपये दराने, त्याची एकूण किंमत 7,19,000 रुपये असणार आहे. अंदाजित विक्री खर्च रु.8,50,000 असणार आहे. एकूण अधिशेष रु.1,31,000 असणार आहे. अंदाजे निव्वळ अधिशेष रु. 1,16,000 म्हणजेच तुमचे वार्षिक उत्पन्न रु. 1.16 लाख असणार आहे.