Business Idea : सरकारकडून सबसिडी मिळवून सुरु करा ‘हा’ व्यवसाय, काही दिवसातच व्हाल करोडपती, जाणून घ्या

Business Idea : भारत हा शेतीप्रधान देश आहे. देशातील शेतकरी शेती आधारित अनेक जोडधंदे करत असतात. जसे की पशुपालन, कुकूटपालन. यातून ते घरखर्च भागवत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशा वेळी तुम्हीही शेतीसोबतच दुधाचा व्यवसाय करत असाल तर ही बातमी नक्की वाचा. या बातमीमधून तुम्हाला शेतकरी पशुपालनातून मोठी कमाई कशी करू शकतो याबद्दल सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.

पशुपालन व्यवसाय भारतातील बहुतेक भागात विविध प्रजातींच्या प्राण्यांसह चालू आहेत. यामध्ये गाय, म्हैस, शेळी, उंट यांसारखे प्राणी दुग्धव्यवसायासाठी पाळले जातात. त्याचप्रमाणे मेंढीपालनातून शेतकरी मोठी कमाई करू शकतात.

Advertisement

मेंढ्यांपासून लोकर, खत, दूध, चामडे अशी अनेक उत्पादने तयार केली जातात. अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता. शेतकऱ्यांमध्ये हा व्यवसाय झपाट्याने लोकप्रिय होत आहे.

मेंढीपालन सुरू करण्यासाठी मेंढ्यांची सर्वोत्तम प्रजाती निवडणे आवश्यक आहे. जेणेकरून दूध आणि लोकर चांगल्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकेल. मालपुरा, जैसलमेरी, मांडिया, मारवाडी, बिकानेरी, मारिनो, कोरीडिलेरा माबुटू, छोटा नागपुरी आणि शहााबाद या भारतातील सर्वात लोकप्रिय मेंढीच्या जाती आहेत.

या व्यवसायासाठी सरकारकडून सबसिडी मिळवा

Advertisement

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मेंढीपालनासाठी 50 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. याशिवाय मेंढीपालनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक राज्य सरकारे आपापल्या स्तरावर आर्थिक मदत करतात.

मेंढ्या हे शाकाहारी प्राणी आहेत. त्यांना हिरवा चारा आणि पाने खूप आवडतात. मेंढीचे शेण हे देखील अतिशय चांगले खत मानले जाते. त्यांच्या वापराने शेतीची उत्पादकता वाढवता येते. सामान्यतः मेंढ्यांचे आयुष्य फक्त 7-8 वर्षे असते. मेंढीपालनातून भरघोस कमाई करण्यासाठी त्यांच्या स्वच्छतेकडे आणि आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे.

खर्च आणि कमाई किती होईल?

Advertisement

15-20 मेंढ्यांपासून पशुपालन सुरू करायचे असेल, तर जातीनुसार एक मेंढी 3000-8000 रुपयांना मिळते. दुसरीकडे 20 मेंढ्यांच्या खरेदीसाठी सुमारे एक लाख ते दीड लाख रुपये खर्च येतो.

तज्ज्ञांच्या मते, 20 मेंढ्यांसाठी 500 चौरस फूटाची जागा पुरेशी आहे. जे 30,000-40,000 रुपये खर्चून तयार केले जाऊ शकते. मेंढ्यांच्या शरीरावर खूप मऊ आणि लांब केस असतात. ज्यापासून लोकर मिळते. ही लोकर विकून शेतकरी करोडपती बनतात.

Advertisement