Business idea : कमी खर्चात सुरु करा ‘हा’ वर्षभर चालणारा व्यवसाय! महिन्याला होईल 50 हजारांची कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business idea : आता व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याकडे जास्त पैसे नसतील तर काळजी करू नका. कारण तुम्ही सहज कमी किमतीत चांगली कमाई करून देणारा व्यवसाय सुरु करू शकता. शिवाय बाजरात याला खूप मागणी आहे. तुम्हाला दरमहा 40 ते 50 हजार रुपये सहज मिळतील. जाणून घ्या सविस्तर.

होईल चांगली कमाई

असे म्हटले जाते की पाणी असेल तर सर्व काही आहे. प्रवासात किंवा घरी, उद्यानात किंवा ऑफिसमध्ये काम करत असाल, ज्यावेळी तुम्हाला तहान लागते त्यावेळी फक्त पाणीच ती तहान शांत करते. त्याशिवाय दुसरे कोणतेही पेय त्याची जागा घेऊ शकत नाही. म्हणजे तो वर्षभर चालणारा हा व्यवसाय आहे. याच पाण्यामुळे तुम्हाला चांगली कमाई करता येईल. परंतु हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला वॉटर प्लांट लावावा लागणार आहे.

कमी गुंतवणुकीत जास्त नफा

हा असा व्यवसाय आहे यात कमी गुंतवणुकीतून मोठा नफा कमावता येतो. बाजारात पाण्याची बाटली 20 ते 40 रुपयांना मिळते. तर त्याची किंमत खूपच कमी आहे. तुम्हाला हा व्यवसाय कमी पैशात उत्कृष्ट परतावा मिळवून देईल. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुमच्याकडे जागा असावी.

5 लाख रुपयांपासून सुरू करता येईल व्यवसाय

या व्यवसायाच्या गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकूण 5 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. तुमचे घर किंवा इतर कोणतीही जागा ज्या ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणी तुम्ही हा मिनरल वॉटर प्लांट लावू शकता. यात तुम्हाला मिनरल वॉटर मशिन लागणार आहे ज्याची किंमत एक लाख रुपये आहे.

या मशिनद्वारे काढण्यात आलेले पाणी स्वच्छ करून आरओ पाण्यात रूपांतरित करतात. खर्चाबद्दल सांगायचे झाले तर, तुम्हाला घर, कार्यालये किंवा दुकानात जारच्या बाटलीतून पाणी पुरवठा करायचा आहे की नाही हे तुमच्यावर अवलंबून असेल.

परवाना महत्त्वाचा

एका दिवसात सुमारे 10,000 लिटर सामान्य पाणी शुद्ध केले जाते. हे पिण्यायोग्य पाणी स्वतःच्या ब्रँडमधून अर्धा लिटर, एक लिटर आणि दोन लिटरच्या बाटल्यांत पुरवता येईल. तुम्हाला ऑर्डर वितरीत करण्यासाठी वाहतुकीची मदत घ्यावी लागेल किंवा तुम्ही एक छोटा लोडर खरेदी करून तुम्ही ते स्वतः पुरवू शकता. र तुम्हाला स्वतःच्या ब्रँडमधून पाणी पुरवठा करायचा असेल तर तुम्हाला स्थानिक प्राधिकरणाकडून परवाना घ्यावा लागणार आहे.

कमाई

तुम्ही तुमच्या प्लांटमध्ये तयार केलेल्या पाण्याच्या बाटल्याची ऑफलाइन किंवा ऑनलाइन विक्री करू शकता. किमतीचा विचार केला तर एक लिटर पाण्याची बाटली बाजारात २० रुपयांना मिळते, अनेक कंपन्या या बाटल्या ४० रुपयांना विकतात. घरे किंवा कार्यालयात पाण्याच्या बाटलीसाठी 40-50 रुपये सहज मिळतात. प्रत्येक महिन्याला तुम्हाला कमीत कमी 50,000 रुपये कमावता येतील आणि त्याचा वापर वाढला तर महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई होईल.