Bussiness Idea : करोडपती व्हायचे असेल तर करा ‘ही’ शेती! कमी खर्चात होईल बक्कळ कमाई, आजच करा सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bussiness Idea : शेतकरी आता शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकांना कमी वेळेत आणि कमी खर्चात बक्कळ नफा कमवायचा असतो, जर तुम्हालाही जास्त पैसे कमवायचे असतील तर जरा इकडे लक्ष द्या.

आता तुम्ही करोडो रुपयांची कमाई करून देणारी चंदनाची शेती करू शकता. तुम्ही या शेतीच्या लागवडीतून अवघ्या 12 वर्षांत तुमचे तब्बल 30 कोटी रुपयांचे मालक होऊ शकता. त्यामुळं आजच या शेतीला सुरुवात करा.

अशी करा चंदनाची लागवड-

भारतात, चंदनाची लागवड दोन प्रकारे करतात, ज्यात सेंद्रिय पद्धत आणि पारंपारिक पद्धतीचा समावेश आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवण्यात आलेले चंदन 10-15 वर्षात लाकडात बदलत असते. मात्र चंदनाची पारंपरिक पद्धतीने लागवड केली तर २०-२५ वर्षांनीच नफा मिळेल.

त्यामुळेच चंदनाची शेती करत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संयमाची बाब ठरत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की एका चंदनाच्या झाडापासून एकूण 15-20 किलो लाकूड मिळते, ज्याची बाजारात 2 लाख रुपयांना विक्री केली जाते. बाजारामध्ये जरी चंदन 3 ते 7 हजार रुपये किलो दराने विकले जात असले तरी मागणी वाढली तर ते 10 हजार रुपयांपर्यंतही विकले जाते.

जाणून घ्या खर्च आणि उत्पन्न-

त्याची रोपवाटिका उभारण्याबद्दल सांगायचे झाले तर एक रोप 100-150 रुपये किमतीत तुम्हाला खरेदी करता येईल. जर शेतकऱ्यांची इच्छा असेल तर त्यांना एक हेक्टर जमिनीवर 600 रोपे लावता येतात. हीच रोपे पुढे झाडे बनू शकतात आणि पुढील 12 वर्षांत ती तुम्हाला तब्बल 30 कोटी रुपयांपर्यंत निव्वळ नफा देऊ शकतात. एकट्या चंदनाच्या झाडातून एकूण ६ लाख रुपये कमावता येतात.

होईल सरकारची मदत

खरंतर काही वर्षांपूर्वीपर्यंत चंदनाच्या लागवडीवर बंदी होती, म्हणजेच शेतकरी केंद्र सरकारची परवानगी घेऊनच चंदनाची लागवड करत होते. परंतु आता परवानगीने त्याच्या लागवडीसाठी सरकार 28-30 हजार रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. इतकेच नाही तर सरकारने चंदन खरेदीवरही बंदी घातली असून शेतकऱ्यांकडून केवळ सरकारच चंदन खरेदी करू शकते.

लक्षात ठेवा या गोष्टी

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकट्या चंदनाचे झाड चुकूनही लावू नका, कारण ही एक परजीवी प्रजाती असून जी इतर झाडांपासून पोषण मिळवते.
  • तसेच चंदनाची झाडे दमट भागात लावू नये, कारण त्याच्या लागवडीला खूप कमी पाणी लागते.
  • त्याच्या लागवडीसाठी, कमीत कमी 2 ते 2.5 वर्षे जुने रोप लावा.
  • चंदन ही झपाट्याने वाढणारी वनस्पती असल्याने इतर प्रकारची झाडे फक्त 4-5 फूट अंतरावर लावणे गरजेचे आहे.
  • हे लक्षात घ्या की चंदनाच्या झाडाला जास्त पाणी दिल्याने ते कुजते, त्यामुळे त्याच्या जवळ पाणी साचू देऊ नका.