आता ईएमआयवर खरेदी करा सोन्याचे दागिने!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:-सोन्याचे वाढलेले दर पाहता इच्छा असूनही एकाचवेळी मोठी खरेदी करणे शक्य होत नाही.

यासाठी आता नगरमधील एस.जी.कायगांवकर ज्वेलर्समध्ये लोन पे गोल्ड ही अभिनव योजना सुरु करण्यात आली आहे. फायनान्स क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमार्फत ग्राहक ईएमआयवर या दालनातून मनपसंत सोने खरेदी करू शकतात.

ही योजना 25 हजारांच्या पुढे पेमेंट स्लिप असलेल्या नोकरदार मंडळींसाठी असून फायनान्सचा लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व प्रोसेसिंग प्रक्रियेसाठी एस.जी.कायगांवकर ज्वेलर्समार्फत आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केले जाईल.

या योजनेमुळे पात्र ग्राहकांची दागिने खरेदीची हौस पूर्ण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सुभाषशेठ कायगांवकर यांनी सांगितले. सागर कायगांकवर यांनी लोन पे गोल्ड योजनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की,

गेल्या काही काळात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्यामुळे दागिने खरेदीसाठी एकदाच मोठी गुंतवणुक करणे शक्य होत नाही. अशावेळी लोन पे गोल्ड योजना अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.

एस.जी.कायगांवकर ज्वेलर्स या दालनात यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी नेट २५ हजार रुपये प्रति महिना वेतन असलेले नोकरदार पात्र असतील.

यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून यात एकूण पगार, नेट पगार याची माहिती असलेली तीन महिन्यांची पेमेंट स्लिप, पगार खाते असलेल्या बँकेचे स्टेटमेंट, इतर कर्ज व ईएमआय याची माहिती,

पॅन आणि आधार कार्ड असे कागदपत्रे व पुरावे आवश्यक आहे. दालनातच लोन प्रक्रियेविषयी एक्सिक्युटीव्हकडून पूर्ण मार्गदर्शन करून फाईल तयार केली जाईल व प्रोसेसिंगसाठी संबंधित कंपनीकडे पाठविण्यात येईल.

कंपनीकडून लोन मंजूर होताच ग्राहकांना मनपसंत दागिने घेवून जाता येणार आहे. ईएमआयनुसार दागिन्यांची निवड ग्राहकांना करता येणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24