कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत फिरते व भाजीपाला विक्रेते यांच्या ठेकयामध्ये भ्रष्टाचार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- कॅन्टोन्मेंट हद्दीतील फिरते व्यापारी भाजीपाला व फळ विक्रेते यांच्याकडून कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मार्फत ठरलेल्या वसुलीचा ठेका जय अर्जुन चव्हाण यांनी घेतलेला आहे.

त्याचा कालावधी 12 जानेवारी 2020 ते 13 जानेवारी 2021 पर्यंत होता परंतु चव्हाण यांच्या हाताने कॅन्टोन्मेंट बोर्डाची काही रक्कम भरण्यास उशीर झाला चेक बाउन्स झाला त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोडणे 3 नोव्हेंबर 2020 रोजी ठेका रद्द केल्याची नोटीस दिली व मला दंडात्मक रक्कम भरण्यास सांगितले व मी ती पूर्ण भरली आहे

तशी भरल्याची पावती सुद्धा माझ्याकडे आहेत कॅंटोन्मेंट बोर्डाने कोरूना काळातील रेमिनेशन दिला होता त्यामधून एक हप्ता घेण्यात आला कॅन्टोन्मेंट बोर्ड कडून काही रक्कम मला मिळणे बाकी आहे मला कॅंटोनमेंट बोर्डाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी मी संबंधित कार्यालयाला दोन लेखी पत्र दिले आहे

मला ते पत्र मिळण्यासाठी त्यांनी जाणून-बुजून रक्कमेची मागणी साठी ते पत्र काढून ठेवले व मला मानसिक त्रास दिला आणि मला त्यांनी तुम्ही मेहतर समाजाचे आहात तुम्ही शौचालयाच्या कामाची आहात असे मला जातिवाचक अपशब्द वापरले व त्यानंतर संदर्भात कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून फोन करून आपले पत्र तयार आहेत

ते घेऊन जावे व 6 ऑगस्ट 2021 चे पत्र मला देण्यात आले मला जाणून बुजून त्रास देऊन माझ्याकडून शिरीष पाटसकर व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीओ विद्याधर पवार यांनी माझ्याकडून रोख रक्कम घेऊन 6 ऑगस्ट 2019 रोजी पत्र देण्यात आले दोन्ही पत्राचा अवलोकन केला असता

कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सचिव विद्याधर पवार यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला आहे तरी याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून त्यांना पदावरून निलंबित करावे तसेच मेहतर समाजाच्या जातीवर शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे डायरेक्टर जनरल दिल्ली व प्रिन्सिपल डायरेक्टर पुणे आदीसह संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24