अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात रस्त्याने चाललेली एक कारावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.
यादरम्यान या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी सकाळी मालदाड येथील एक कुटुंबिय लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने अंत्यविधीसाठी कार प्रवास करीत होते.
दरम्यान ते तळेगाव दिघे गावाच्या दिशेने प्रवास करीत असताना अचानक कार ( क्र. एमएच १५ डीसी ९३७८ ) रस्त्याच्याकडेच्या साईड गटारात जावून तीन लट्या खात शेजारील शेतात अपघातग्रस्त झाली.
या अपघातात कारमधील बाबासाहेब नवले ( वय ४० वर्षे ), बाजीराव नवले ( वय ५० वर्षे ) व नंदा नवले ( वय ४५ वर्षे सर्व रा. मालदाड ) हे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी मदतकार्य करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. या अपघाताबाबत स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कळविले होते.
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |