कारवाईअभावी नागरिक बेफिकीर; संक्रमणाचा धोका वाढण्याची शक्यता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:-कोरोना विषाणुंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

तथापि, जे नागरिक आदेशाचे पालन करत नाहीत, त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आलेले आहेत. मात्र तीन दिवसांपूर्वी महापालिका कर्मचाऱ्या्ला मास्क प्रकरणी दंडात्मक कारवाई करताना मारहाण झाल्यामुळे मनपा कर्मचाऱ्यांनी संरक्षणाची मागणी करत कारवाई थांबवली आहे.

याप्रश्नी अद्याप तोडगा न निघाल्याने मनपामार्फत कारवाई बंदच आहे. बुधवारी प्रशासनाला कामगार युनियनमार्फत पत्र दिले जाणार आहे. जिल्ह्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असलयाचे दिसून येत आहे. यामुळे प्रशासन तातडीने सतर्क झाले असून, कोरोनाची साखळी मोडण्यासाठी सरसावली आहे.

दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश असतानाही एक अनपेक्षित घटना शहरात घडली होती. शहरात गेल्या तीन दिवसांपूर्वी सावेडी भागात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरू असताना एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली होती.

याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांत तक्रारही देण्यात आली होती. या प्रकरणानंतर कामगार युनियनने बैठक घेऊन पोलिस व मनपा कर्मचाऱ्यांची संयुक्त टास्क फोर्स नेमावी तसेच मारहाणार करणाऱ्या डाॅक्टरचा वैद्यकीय परवाना निलंबित करावा, अशी मागणी लावून धरली आहे.

मनपात गेटसभा घेतल्यानंतरही प्रशासनाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सांगितले. बुधवारी मनपा प्रशासनाला युनियनची लेखी भूमिका कळवली जाणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24