Cars Price Hike : बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी ऑटो कंपनी Kia ची कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कंपनीने मोठा निर्णय घेत आता आपल्या कार्सच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. यामुळे आता तुम्हाला नवीन कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. चला तर जाणून घ्या कोणत्या कारवर किती रुपये वाढवण्यात आले आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि कंपनीची नवीन किंमत Seltos, Sonnet, Carens, EV6 या कार्सवर लागू होणार आहे. तर Carnival जुन्या किमतीत विकले जात आहे. जानेवारी 2023 मध्ये नवीन Kia किमतीत 20,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत वाढ केली जात आहे. या दरवाढीमुळे वाढत्या वस्तू आणि वाहतूक खर्चाची भरपाई होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
kia seltos ची किंमत किती वाढली ?
Kia Seltos च्या किमती 20,000-50,000 रुपयांनी वाढल्या आहेत आणि आता बेस HTE पेट्रोल व्हेरियंटसाठी 10.69 लाख रुपयांपासून ते टॉप स्पेक X-Line AT डिझेल ट्रिमसाठी 19.15 लाखांपर्यंत आहेत. सर्व डिझेल व्हेरियंट 50,000 रुपयांनी महाग झाला आहे.
kia carens ची किंमत किती वाढली ?
Kia Carens MPV आता 20,000-45,000 रुपयांनी महाग झाली आहे. पेट्रोल व्हेरियंटमध्ये 20,000-25,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर डिझेल व्हेरियंटमध्ये 45,000 रुपयांची वाढ झाली आहे. किमतीच्या वाढीनंतर, बेस 1.5L MT प्रीमियम पेट्रोल ट्रिमची किंमत आता 10.20 लाख रुपये आहे, तर टॉप स्पेक लक्झरी प्लस 7-सीटरची किंमत आता 18.45 लाख रुपये आहे.
Kia Sonet ची किंमत किती वाढली ?
Kia Sonet च्या किंमती व्हेरियंटनुसार 20,000 ते 40,000 रुपयांनी वाढल्या आहेत. 1.2L इंजिन असलेल्या पेट्रोल व्हेरियंटची किंमत 20,000 रुपयांनी वाढली आहे, तर HTE बेस व्हेरिएंटची किंमत पूर्वीच्या 7.49 लाख रुपयांवरून 7.69 लाखांवर गेली आहे, तर HTK आणि HTK+ ची किंमत 20,000 रुपयांनी वाढून 8.45 रुपये झाली आहे आणि ते अनुक्रमे 9.39 रुपये झाले आहे.
Sonet 1.0L टर्बो पेट्रोल iMT व्हेरियंट आणि DCT व्हेरियंटची किंमत रु. 25,000 इतकी वाढली आहे आणि HTK+ ते GTX+ व्हेरियंटची किंमत रु. 10.24 लाख ते रु. 12.94 लाखांपर्यंत वाढल्यानंतर, तर टॉप स्पेक X-Line DCT ची किंमत आता रु. 13.64 लाख रुपये आहे. Kia Sonet डिझेल व्हेरियंट 40,000 रुपये जास्त आहे आणि नवीन किंमती 9.45 लाख ते 14.39 लाख रुपये आहेत.
EV6 ची किंमत किती वाढली ?
Kia EV6 ची किंमत जानेवारी 2023 मध्ये सर्वात मोठी वाढ झाली आहे. RWD सह EV6 ची GT लाइन रु. 1 लाख ने वाढून रु. 60.95 लाख झाली आहे, जी पूर्वी रु. 59.95 लाख होती. GT लाइन AWD ची किंमत आता रु. 65.95 लाख आहे, जी पूर्वी रु. 64.95 लाख होती. या सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत.