अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- रुग्णालयांविराेधात सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन हॉस्पिटलचे जितेंद्र भावे यांच्यािवराेधात विजय हाॅसि्पटलने सरकारवाडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दाेन दिवसांपूर्वीच भावे यांनी वाेक्हार्ट हाॅसि्पटलमध्ये अर्धनग्न आंदोलन केले हाेते.
त्यानंतर मुंबई नाका पोलिसांनी त्यांना समज देऊन साेडून दिले हाेते. विजन हॉस्पिटलमध्ये दि. २२ मे राेजी झालेल्या घटनेबाबत जितेंद्र भावे यांच्याविराेेधात सरकारवाडा पोलिसांत काल सायंकाळी गुन्हा दाखल केला असून, डाॅ. विक्रांत विजन यांनी याबाबतची फिर्याद पाेिलसांत दिली आहे.
डाॅ. विजन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आंतररुग्ण दत्तात्रय आटवणे हे कोविड आजाराने दि. २१ मे रोजी उपचारादरम्यान मयत झाले.
त्यानंतर मयताचे नातेवाईक स्वप्निल आटवणे, सायली आटवणे त्यांचे साथीदार जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे आणि रोहन देशपांडे यांनी ओपीडीमध्ये विनाकारण गर्दी करून हॉस्पिटलने जास्त बिल आकारल्याचे सांगत रुग्णांवर केलेल्या उपचाराच्या मूळ कागदपत्रांची मागणी केली.
तसेच हॉस्पिटल प्रशासनास वेठीस धरले आणि हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी यांना धमकावून हॉस्पिटलच्या दैनंदिन कामात अडथळा निर्माण केला. वैद्यकीय, मेडिकल आणि रक्त तपासणीच्या खर्चाची मूळ बिले घेऊन बाकी राहिलेली रक्कम न भरता निघून गेले.
असा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. याप्रकरणी स्वप्नील आटवणे, जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.