अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- हजाराे वर्षांपासून जाती अस्तित्वात असून अगाेदर जातीजातीत प्रेमभावना हाेती. मात्र, वर्ष १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जाणीवपूर्वक जातीय द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यानंतर अजूनही निवडणुकीत रस्ते, पाणी, वीज, शिक्षण, राेजगार याच मुुद्द्यांवर निवडणुका सुरू असून जातीपातीच्या राजकारणात आपण खितपत पडलाे आहोत.
यादृष्टीने आपण नेमके काय कमावले याचे उत्तर शाेधण्याची वेळ आली असल्याची भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त शुक्रवारी केली.
ठाकरे म्हणाले, ज्याप्रमाणे माझे आजाेबा प्रबाेधनकार ठाकरे यांची पुस्तके मी वाचली त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाणांच्या पुस्तकांचे वाचन केले.
मी जातीबाबत जी भूमिका मांडली त्याच्याशी प्रबाेधनकार ठाकरेंच्या पुस्तकाचा काय संबंध हे जरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी समजवून सांगावे. स्वत:ला पाहिजे तितका मुद्दा उचलायचा असे चालणार नाही, असेही राज यांनी या वेळी ठणकावले.