अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील कान्होळा नदी पात्रातुन वाळू तस्कर अवैध वाळू उत्खनन करीत असतानाच कर्जत पोलिसांनी धाड टाकून संबंधित ठिकाणाहून वाळूसह एक ट्रॅक्टर जप्त केला आहे.
कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाचपुते, गोरख जाधव यांनी सदर कारवाई केली आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणाहून महिंद्रा अर्जुन ट्रॅक्टर ५०५ व वाळू भरलेली ट्रॉली ताब्यात घेतली.
असा वाळूसह ५ लाख १० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाण्यात वाळूचोरीबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार जालिंदर पाचपुते करत आहेत.