अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- उन्हाळी माऱ्यापासून स्वत:ला वाचवतानाच आपले अन्नही वाचवावे लागते अन्यथा खूप जास्त त्रास होऊ शकतो. अनेक खाद्यपदार्थ वाढलेल्या तापमानात लवकर खराब होत असतात आणि त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे जंतू वेगाने उत्पन्न होतात. ज्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.
या मोसमात बाहेरच्या खाद्य-पेय पदार्थांमध्ये हवी असूनही अन्नाची गुणवत्ता आणि त्यांचे ताजे असणे सुनिश्चित करता येऊ शकत नाही. घरातही शिळे पदार्थ फेकून देण्याऐवजी खाऊन संपवण्याची प्रव्ती असते, पण यामुळे होणारे नुकसान कित्येक पटीने जास्त असू शकते.
यासाठी मोसम अनुरूप खाण्या-पिण्यात बदल करायला तर हवाच सोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्या व सेवनाच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात.
» का होते फूड पॉयझनिंग : – फूड पॉयझनिंग होण्याची अनेक कारणे आहेत. सामान्यतः शिळे, खराब वा सडलेले पदार्थ खाल्ल्यामुळे ही समस्या होऊ शकते. रोगप्रतिकारक्षमता जर कमकुवत असेल तर त्याचे दुष्परिणाम अधिकच गंभीर असतात. पोटदुखी, डायरिया, जुलाब इ. समस्या होतात.
मुले आणि वृद्धांना याचा सर्वांत जास्त त्रास होतो. मटण आणि भाज्या इ.द्वारे बॅक्टेरिया पसरू शकतो. अर्धवट शिजलेल्या आणि खराब अन्नामुळेही धोका असतो ज्यामध्ये मूळ रूपात क्लोस्ट्रीडियम, साल्मोनेला आणि ई-कोलाई संक्रमण दिसून येते. हे गंभीर स्थितीत प्राणही संकटात टाकू शकते.
जर एखाद्याला बद्धकोष्ठता, गॅस इ.सारखी पोटासंबंधी एखादी समस्या पूर्वीपासूनच असेल, तर त्याच्यावर फूड पॉयझनिंगचा जास्त परिणाम होण्याची शयता असते.
» दक्षता सुनिश्चित करा : – जेव्हा अन्न चांगल्या प्रकारे शिजवले जात नाही तेव्हा ते लवकर खराबही होते. डाळ असो बा भाजी व्यवस्थित शिजवा. गरज लक्षात ठेवूनच जेवण बनवा.
तरीही अन्न उरले तर ते गरम करा आणि ९0 मिनिटांनंतरच फ्रिजमध्ये ४ डिग्री सेल्सियसवर ठेवा. फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर पदार्थ २४ तासांच्या आतच खायला हवेत. हीच गोष्ट सर्व कच्च्या व शिजलेल्या भाज्या आणि रसाळ फळांवरही लागू होते. तीही ४ डिग्री तापमानावर स्टोअर करावीत.
चपात्या-भाकरी ठेवू नयेत. त्या तेवढ्याच बनवाव्यात जेवढी आवश्यकता असेल. शिजवलेले अन्न वारंवार शिजवून वा गरम करून खाऊ नये कारण ते पोटासाठी हानिकारक असू शकते. 0 घरात पाळीव प्राणी वा पक्षी असेल तर त्यांना जेवणाच्या जागेपासून दूर ठेवावे. प्राण्यांच्या त्वचेत अनेक प्रकारचे जंतू असतात जे अन्न-पाणी दूषित करू शकतात .
» लक्षणे लक्षात घ्या…
० कित्येकदा फूड पॉयझनिंगचे सुरुवातीचे लक्षण पोटदुखी असते.
० काहीही खाल्ल्यानंतर त्वरित उलटी बा जुलाब होणे. ० तापही असू शकतो. अशक्तपणा जाणवतो.
० वारंवार उलटी व जुलाब होणेही फूड पॉयझनिंगचे लक्षण आहे. ० बऱ्याचदा डोकेदुखीही होते.
० जर एखाद्याला जेवणानंतर अचानक अशक्तपणा जाणवू लागला तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
» सल्ला घ्यायला हवा : –
० पोटाची कोणतीही समस्या किरकोळ समजून घरगुती उपचार करू नयेत. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
० चुकून जरी खराब पदार्थ खाल्ला तर डॉक्टरांना दाखवावे. फूड पॉयझनिंग ची लक्षणे दिसल्यास वाट पाहू नये.
० फक्त पोटदुखीची समस्या सांगून केमिस्टकडून औषध घेऊ नये. कारण यामुळे काही काळासाठी दुखणे थांबेल, पण पुढे समस्या वाढू शकते.
० भरपूर प्रमाणात पाणी प्या, पण पाणी स्वच्छ असल्याची म्हणजेच फिल्टर वा उकळलेले असल्याची खात्री करा.
० काही लोकांना लवकर फूड पॉयझनिंग होत असते, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन काही सामान्य औषधे कायम जवळ ठेवावीत.